चंद्रपूर – फायटर स्केट इंडिया फौंडेशनच्या वतीने स्केट चॅम्पियनशिप इंडिया 2022 अंतर्गत सेंट्रल इंडिया फर्स्ट नाईट नॅशनल स्पीड स्केटिंग चॅम्पियन शिप 2022 स्पर्धेचे आयोजन नागपुरात गायकवाड पाटील इंटरनॅशनल स्कुल येथे 14,15 मे ला करण्यात आले होते.
या स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यातून अनेक स्पर्धकांनी भाग घेत चंद्रपूर जिल्हाचे नाव चमकविले.जिल्ह्यातील खेळाडू ने उत्कृष्ट कामगिरी करीत रिंक रेस व रोड रेस मध्ये सुवर्ण,कांस्य तसेच रजात पदक मिळविले.
ह्या खेळाडू मध्ये शिवसाई प्रतिष्ठान येथे चालत असलेलेल्या
वैभव धूर्वे,सोहम पुणेकर, युघधा रामटेके,अभिष्ठण नगराळे, प्राची पुणेकर,नक्ष वैरागडे,आरुषी वैरागडे, शिवण्या एकरे,निकुंज काळे,कार्तिक मुत्याल्वर व आरूष पूल्लावर ह्यांनी उत्कृष्ट कामगिरी करीत पदक मिळविले.ह्या कामगिरी साठी चंद्रपूर जिल्ह्यातील विख्यात
प्रशिक्षक आतिष धुर्वे यांचे मार्गदर्शन खेळाडूना लाभले.
ह्या स्पर्धेचे उद्घाटन फायटर स्केट इंडिया फौंडेशन पुणे चे संचालक अथर्व देशपांडे यांच्या हस्ते झाले.प्रमुख अतिथी म्हणून विलास देशपांडे,गायकवाड पाटील इंटरनॅशनल स्कुल च्या प्राचार्या होत्या.
पदक प्राप्त केल्याबद्दल सर्व खेळाडूचे सर्वत्र अभिनंदन केले जाते आहे.
Add Comment