पोलीस रिपोर्टर महाराष्ट्र

अवैध कोंबड बाजारावर पोलिसांची धाड

ब्रम्हपुरी-तालुक्यातील भालेश्वर येथे कोंबड बाजारावर पोलिसांनी धाड टाकून 12आरोपींसह 1लाख अकरा हजार 230 मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कार्यवाही रविवारी करण्यात आली आहे.
गुप्त माहितीच्या आधारे ब्रम्हपुरी पोलिसांनी लपत छपत जाऊन वैनगंगा नदीच्या काठावर भरविण्यात आलेल्या कोंबड बाजारावर धाड टाकली असता काही जुगारी पळण्यात यशस्वी झाले परंतू अटक झालेल्या मध्ये उत्तम दोनाडकर ,रामसागर बेदरे रा. अरेहनवरगाव,माणिक सहारे, रुपचंद दिघोरे, सोपान दिघोरे, अशोक दिघोरे, शरद भागडकर, सुधाकर दिघोरे सर्व राहणार भालेश्वर, यादव रडके रा. पांहोळी, राहुल रामटेके रा.ब्रम्हपुरी,विवेक चुधरी रा.कुरखेडा.धनराज देशमुख रा.मौशी असे आरोपींचे नाव असून त्यांचेवर मुंबई जुगार कायदा कलम 12 अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्यात कोंबड जुगारातील सहा जखमी कोंबडे, एक मोटरसायकल, चार सायकल, मोबाईल फोन व नगदी असा ऐकूण 1लाख11हजार रुपयांचा 230 मुद्देमाल घटनास्थळवरून जप्त करण्यात आला आहे. सदरची कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांच्या आदेशनव्ये पोलीस निरीक्षक रोशन यादव यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलिस निरीक्षक आशिष बोरकर, पो उप नि सुरेंद्र उपरे, अरुण पिसे,अशोक मांदाडे,विलास गेडाम,सचिन बारसागडे, नितीन भगत, राहूल लाखे, धनराज नेवारे, उमेश बोरकर, नाजूक चहांदे, मुकेश गजबे, प्रमोद सावसाकडे, व अन्य या पथकाने केली आहे.

About the author

लोकवाचक न्यूज

श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959

Add Comment

Click here to post a comment

error: Sorry !! Content is Copyright protected !!