महाराष्ट्र सामाजीक

सिरपूर येथे संत दास नारायण महारांजाच्या मुर्तीची प्राण प्रतिष्ठा श्री संत दास नारायण महाराज सेवाश्रम परीवाराचे आयोजन

चिमूर
चिमूर तालुक्यातील श्री क्षेत्र गुरुधाम तिर्थ सिरसपूर ( शिवरा) येथे श्री संत दास नारायण महाराज सेवाश्रम परीवार पारडी यांचे तर्फे २७ मार्च ते ३ एप्रीलला श्रीमद भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.या दरम्यान श्री संत दास नारायण महाराज यांचे मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे.
रविवार फाल्गुन कृष्ण दशमी दिनांक २७ मार्च पासुन पहाटे ५ वाजता मंगलवाद्य,भुपाळी,गजानन महाराज स्नान,मंगल कलश पुजन,अखंड ज्योत प्रज्वलन,होम हवन यज्ञ होणार आहे.त्यांनतर श्रीमद भागवत महापुराण प्रवचन,हिरामन थेटे महाराजांचे वारकरी भजना नंतर हरीपाठ आरती,शांतीपाठ होईल.१ एफ्रीलला प्रायश्चित्त संकल्प,मुख्य संकल्प,मातृपितृ पुजन तथा श्राद्धादी विधी विष्णु गोविंद आर्विकर शास्त्री यांचे उपस्थीत होणार.२ एप्रिलला भागवत महापुराण समाप्ती,ग्रंथपुजन, होमहवन,पुर्णाहुती,पिंडपुजन,विष्णुपुजन इत्यादी होईल. सांयकाळी गुरुवर्य श्री संत दास नारायण महारांजांची मुर्ती मंगल वाद्य,अश्वरिंगणासह आगमन होईल.
३ एप्रिल रविवारला मुर्ती स्थापन करून प्राण प्रतिष्ठा केल्या जाईल.भिसी येथुन सतगुरु गजानण महाराजांच्या पालखीचे आगमन होईल.यानंतर विविध ठिकाणावरून आलेल्या ११ भजन मंडळे भजन गजर करतील.हभप संगिता गलांडे यांचे संकिर्तन होईल.या कार्यकमास राज्याचे बहुजन कल्याण तथा जिल्ह्याचे पालक मंत्री विजय वडेट्टीवार,धनराज मुंगले,ममता डूकरे,भिमराव ठावरी इत्यादींची उपस्थिती लाभणार आहे.या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री संत दास नारायण महाराज सेवाश्रम पारडी,नागपूर येथील अंनत वैष्णव यांनी नागरीकाना केले आहे.

About the author

लोकवाचक न्यूज

श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959

Add Comment

Click here to post a comment

error: Sorry !! Content is Copyright protected !!