राज्यात करोना नी थेमान घातले असता, एकीकडे आरोग्य यंत्रणा व प्रशासन ह्यावर कसे नियत्रन मिळवता येईल ह्या वर अनेक उपाय योजना राबवित असून.. दुसरीकडे जिल्ह्यातील नागरिकांना ह्याचे काही ही गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.
करोना संसर्ग कमीत कमी व्हा या दृष्ीकोनातून तहसील प्रशासन ही अहोरात्र प्रयत्न करीत आहे.
त्या अनुषंगाने आज दी.10/5 ला Covid नियमाचे उल्लंघन केल्याबद्दल सपना कलेक्शन चंद्रपूर यावर रोहन घुगे, उपविभागीय अधिकारी व निलेश गौंड तहसीलदार चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली सचिन खंडाळे नायब तहसिलदार चंद्रपूर, प्रवीण वरभे, विशाल कुऱ्हेवर व महिला तलाठी पौर्णिमा बदखल यांनी 55,000/- दंडाची कार्यवाही केली.
कार्यवाही वेळी सदर दुकान हे 12 वाजेपर्यंत चालू असताना चे आढलून आले व त्यात 28 ग्राहक व इतर कर्मचारी दुकानात होते.
ह्या कार्यवाही ने इतर व्ावसायिक मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
आदेशाची अवहेलना केल्यास कार्यवाही करू असे तहसील कार्यालयावकडून कळविण्यात आले आहे.
नियंमाचे पालन न करणाऱ्या प्रतिष्ठाना वर तहसील कार्यालय पथकाची कार्यवाही…


चंद्रपूर :-
Add Comment