चंद्रपूर: चंद्रपूर शहर महानगरपालिका मधिल सर्व मालमत्ता धारकाना महापालिके तर्फे आव्हान करण्यात येते. कोव्हीड – १९ कोरोणा विषाणूच्या प्रादुर्भाव पसरु नये. म्हणून शासनाकडून माहे मार्च २०२० पासून लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. त्या काळात व्यापार व व्यवसाय बंद असल्यामुळे व्यापारी वर्ग आणि समाजाचे घटक कामगार वर्ग यांना आर्थिक अडचण निर्माण झाल्यामुळे कराचा भरणा करता आला नाही, तसेच प्रशासकीय कारणास्तव व शासनाकडून वारंवार लॉकडाऊन सुरु असल्याने शहरातील मालमत्ता धारकांना सन २०२०- २१ चे मालमत्ता कराची देयके मिळण्यास विलंब झालेला आहे.
चंद्रपूर शहर महानगरपालिका दिनांक ३१/०७/२०२० ला झालेल्या व्हिडीओ कानफ्रन्सद्वारा झालेल्य सर्व साधरण सभेतील इतिवृत्त व मला महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कराधन ८ मधिल कलम ५१ अन्वये दिलेल्या अधिकाराचा वापर करुन सन २०१९-२० पर्यंतचा थकबाकी व मालमत्ता व इतर कराचा तसेच सन २०२०-२१ या आर्थिक वर्षातील मालमत्ता व इतर कराचा एकरक्कमी भरणा दिनांक ०१/११/२०२० ते ३०/११/२०२० पर्यत करण्याच्या मालमत्ता धारकांना १०० % शास्तीत सूट देण्यात येईल. सर्व मालमत्ता धारकांनी नोद घ्यावी.
Add Comment