चिमूर ता. प्र सुरज. नरूले
भारतीय जनता पार्टी चिमूर तालुका अध्यक्ष पदावर पंचायत समिती चे माजी सभापती राजू पाटील झाडे यांची आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या उपस्थितीत निवड करीत घोषणा करण्यात आली.
यावेळी आमदार बंटीभाऊ भांगडीया म्हणाले की चिमूर विधानसभा मध्ये भाजप संघटना मजुबत करण्यासाठी सहकार्य देण्याचे विश्वास देऊन हा क्षेत्र गड अबाधित राहील असा विश्वास दिला. तालुक्यात जुन्या नवीन वाद होण्यापेक्षा क्षमते चा फायदा घेण्यासाठी निर्णय घ्यावे लागते आहे पक्ष हा परिवार असून सर्वच सारखे असताना सर्वांची सहमती घेऊन तालुका अध्यक्ष पदी राजू पाटील झाडे ची निवड करण्यात आली असल्याचे सांगत भाजप संघटना मजबुती साठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
यावेळी भाजप प्रदेश सदस्य डॉ श्यामजी हटवादे, भाजप प्रदेश अल्पसंख्याक महामंत्री जुनेदखान ,भाजप जिल्हा उपाध्यक्ष निलम राचलवार ,जिल्हा सचिव राजू देवतळे ,जीप उपाध्यक्ष सौ रेखाताई कारेकर , महिला तालुका अध्यक्ष सौ मायाताई ननावरे , माजी सभापती प्रकाश वाकडे, सौ छाया कंचर्लावार ,भारती गोडे , कल्याणी सातपुते, रत्नमाला मेश्राम सतीश जाधव , दिगंबरराव खलोरे, नितीन गभणे विनोद चोखरे, प्रशांत चिडे, संजय कुंभारे ,अशोक कामडी ,टीमु बलडवा , कैलास धनोरे, रमेश कंचर्लावार, सुरज नरुले ,विलास कोराम ,सचिन बघेल ,अजय शीरभैय्ये ,सावन गाडगे बाबा ननावरे गुलाबराव फरकाडे आदी उपस्थित होते .संचालन एकनाथ थुटे यांनी केले .
Add Comment