Breaking News चंद्रपूर जिल्हा घडामोडी पोलीस रिपोर्टर महाराष्ट्र

रामनगर पोलिसानी मोटार सायकल चोरणाऱ्या आरोपीस केली अटक . .. १,७५,००० रू. चा मुद्देमाल जप्त

lokwachaknews
    
दिनांक २८/११/२०२१ रोजी पोलीस स्टेशन रामनगर येथील फिर्यादी नामे सतिश दुर्गया सावनपेल्लीवार, वय – ३४ वर्ष, धंदा चालक, रा. शिवा टेलर यांचे घरा जवळ, रयतवारी कॉलनी, चंद्रपुर यांनी रिपोर्ट दिली की, दिनांक २६/११/२०२१ रोजीचे फिर्यादीचा भाउ हा फिर्यादीचे मालकीची होंडा कंपनीची स्पेल्डर गाडी क्रमांक एम.एच. ३४ एव्हि ७१९९ किमंत ३५,०००/- रूपयाची गाडी घेवुन आंध्रा बॅक मच्छीनाल्याजवळ, चंद्रपुर येथे गेला गाडी बाहेर ठेवुन बॅकचे काम पुर्ण करून परत आला असता ठेवलेल्या ठिकाणी गाडी दिसुन न आल्याने आजु – बाजुच्या परिसरात शोध घेतला असता गाडी मिळुन न आल्याने पोलीस स्टेशन, रामनगर येथे अप.क. १२०१ / २०२१ कलम ३७९ भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद करून तपासात घेतला.    नमुद गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेणे कामी डी.बी. पथकातील अधिकारी व कर्मचारी हे पोलीस स्टेशन हद्दीत रवाना होवुन गोपनिय बातमिदाराचे माहिती वरून आरोपी नामे सुमोहित उर्फ गोलु चंद्रशेखर मेश्राम, वय – २३ वर्ष, रा. अष्टभुजा वार्ड, सुलतान चौक, चंद्रपुर यास ताब्यात घेवुन पोस्टेला अटक करून गुन्हयात चोरीस गेलेली गाडी जप्त करण्यात आली आहे.    नमुद गुन्हयातील आरोपी नामे सुमोहित उर्फ गोलु चंद्रशेखर मेश्राम, वय – २३ वर्ष, रा. अष्टभुजा वार्ड, सुलतान चौक, चंद्रपुर यास अधिक विचारपुस केली असता, त्यांने पुढील प्रमाणे कबुली दिली यापुर्वी पोस्टे रामनगर हद्दीतील बंगाली कॅम्प येथील मोपेड होन्डा अॅक्टीव्हा कंपनीची गाडी क्रमांक एम.एच. ३४ बीई ५८९० किमंत ३०,००० /-रू, हिरो होंडा कंपनीच स्पेल्डर गाडी क्रमांक एम. एच ३४ क्यु १०७१, पोस्टे सावली हद्दीत घोडेवाही कोंडेकल रत्यावर मोपेड गाडीला अडवुन महिलेस चाकु दाखवुन तिचे अंगावरील सोन्याचे चैन जबरदस्तीने हिसकावुन नेली, जिल्हा – गडचिरोली, पोस्टे आष्टी हद्दीतील रोडवर ठेवलेली होंडा कंपनची मोपेड अॅक्टीव्हा गाडी क्रमांक एम. एच. ३३ एबी ३२९२ किमंत ६०,००० /- रू., पोस्टे पडोली हद्दीतील मोपेड टिव्हीएस ज्युपीटर गाडी क्रमांक एम.एच. ३४ बीयु ०१३२ किंमत ५०,००० /- रू. अशा प्रकारचे गुन्हयाची कबुली दिली आहे.    सरदचा गुन्हा उघडकीस आणणे कामी गुन्हे शोध पथकाती सपोनि हर्षल अकरे, पोउपिन विनोद भुरले तसेच सर्व डी. बी. पथकातील कर्मचारी हे अतिशय परिक्षम घेवुन गुन्हयातील अज्ञात अनोळखी आरोपीचा शोध घेवुन पोस्टे, रामनगर येथील ३ गुन्हे, पोस्टे सावली येथील १ न्हा, पोस्टे पडोली १ गुन्हा तसेच जिल्हा गडचिरोली पोस्टे आष्टी येथील १ गुन्हा असे एकण ६ गुन्हयाची कबुली दिले वरून खालील प्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.जप्त माल –
१) होंडा कंपनीची स्पेल्डंर गाडी क्रमांक एम.एच. ३४ एव्हि ०४ डिसेंबर, २०२१ :

७१९९ किमंत ३५,०००/- रू

२) मोपेड होन्डा अॅक्टीव्हा कंपनीची गाडी क्रमांक एम. एच. ३४

बीई ५८९० क३०,०००/- रू

३) होंडा कंपनची मोपेड अॅक्टीव्हा गाडी क्रमांक एम. एच. ३३

एबी ३२९२ कि ६०,०००/- रू. ४) मोपेड टिव्हीएस ज्युपीटर गाडी क्रमांक एम.एच. ३४ बीयु

०१३२ किंमत ५०,०००/- रु.,

असा एकुण १,७५,०००/- रू.    सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. अरविंद साळवे सा. चंद्रपुर, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. अतुलचंद्र कुलकर्णी सा. मा. उपविभागिय पोलीस अधिकारी श्री. नंदनवार सा. यांचे मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस निरीक्षक श्री. मधुकर गिते, सपोनि हर्षल ओकरे, पोउपनि विनोद भुरले, पोहवा मरसकोल्हे, पो.हवा. रजनीकांत पुठ्ठावार, पोहवा / २४५४ प्रशात शेंदरे, नापोशि/ पुरूषोत्तम चिकाटे, नापोशि/ विनोद यादव, नापोशि / ०९ पेतरस सिडाम, नापोशि / संजय चौधरी, नापोशि / ११७६ किशारे वैरागडे, नापोशि/ आंनद खरात, नापोशि/ पांडुरंग वाघमोडे, नापोशि / ९१७ निलेश मुडे, नापोशि / सतिश अवथरे, पोशी / २४३० लालु यादव, पोशि/ २५१३ विकास जुमनाके, पोशि/ २४३८ माजीद पठान, पोशि/ संदिप कामडी, पोशि/ हिरालाल गुप्ता, मनापोशि/ २३२४ भावना तसेच सायबर सेल, चंद्रपुर येथील पोलस कर्मचारी यांनी केली आहे.


About the author

लोकवाचक न्यूज

श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959

Add Comment

Click here to post a comment

error: Sorry !! Content is Copyright protected !!