पोलीस रिपोर्टर महाराष्ट्र

रामनगर पोलीसांनी मोटर सायकल चोराला केले जेरबंद….

चंद्रपूर – दिनांक 29/04/2022 रोजी फिर्यादी नामे मनोज मनोहर देवनाथ, वय-37 वर्ष, रा.क्रिशष्णानगर, मुल रोड, चंद्रपुर यांनी पोस्टेला रिपोर्ट दिली की, दिनांक 27/04/2022 रोजी फिर्यादी हा त्याची होंडा अॅक्टीव्हा मोपेड गाडी क्रमांक एम.एच. 34 ए एन 4101 किमंत 20,000/- रूपये गाडी घेवुन झाझीर कॅम्प्लेक्स इंडस्ट्रीयल बँक येथे येवुन पार्कींग करून ठेवुन बँकेमध्ये पैस जमा करण्यात करीला जावुन पैस जमा करून गाडी ठेवलेल्या ठिकाणी परत आला असता गाडी दिसुन आली नाही. गाडीचा आजु बाजुच्या परिसरात शोध घेतला असता मिळुन न आल्याने फिर्यादीचे ताँडी रिपोर्ट वरून अप. क्रमांक 410/2022 कलम 379 भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद करून तपासात घेतला आहे.

• नमुद गुन्हयात चोरीस गेलेली मोपेड गाडीचा शोध घेणे कामी सपोनि हर्शल अकरे, पोउपनि विनोद भुरले तसेच डि.बी. स्टाफ असे पोस्टे परिसरात रवाना होवुन गोपनिय बातमिदार तसेच पोस्टे रेकार्डवरील मोटार सायकल चोरी करण्याच्या सवईचा आरोपी नामे अतुल विकास राणा, वय-23 वर्श, रा. शामनगर, भगतसिंग चैक, चंद्रपुर याचा शोध घेवून त्यास ताब्यात घेवुन विचारस केली असता त्याचे ताब्यात गुन्हयात चोरीस गेलेली 1) होंडा अॅक्टीव्हा मोपेड गाड़ी क्रमांक एम. एच. 34 ए एन 4101 किमत 20,000/- रु. ही मिळुन आली. व तसेच यापुर्वी पोस्टे रामनगर हद्दीतुन चोरीस गेलेल्या 2) लाल रंगाची यामाहा मो. सा. क्र. एम. एच. 34 ए जी 0861 किमंत 30,000/- रू. 3) काळया रंगाची हाँडा शाईन मो.सा. क्र. एम. एच. 29 ए बी 2381 किमंत 30,000/- रु. 4) काळया रंगाची बजाज प्लसर मो.सा. बिना नंबरची चेचीस क्र. MP2DHDH22TC012427 इंजिन क्रमांक DHGBTD 1694 किमंत 40,000/- रु. 5) निळया काळया रंगाची हिरो होन्डा स्पेल्डर मो.सा. क्र. एम. एच. 34 जे 3726 किमंत 20,000/- 6) काळ्या रंगाची पेंशन प्रो मो.सा. क्र. एम. एच. 29 एव्ही 5396 किमत 40,000/- रु. 7) काळ्या रंगाची हिरो सी बी झेड मो.सा. क्र. चेचीस क्रमांक MBLC12EBU03439 इंजिन क्रमांक KCLZEDBGJ03969 किमंत 30,000/- रू. असा एकूण 2,10,000/- रूपयेकिमंतीचे मोटर सायकल मिळुन आल्या आहेत. नमुद आरोपीला अटक करुन पुढील तपास पोस्टे रामनगर करित आहे.

सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. अरविंद साळवे सा. चंद्रपुर, मा. उपविभागिय पोलीस अधिकारी श्री. सुधीर नंदनवार सा. यांचे मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस निरीक्षक श्री. राजेश मुळे, सपोनि हर्शल अंकरे, पोउपनि विनोद भुरले, पो.हवा. रजनीकांत पुठ्ठावार, प्रशाल शदरे, पेतरस सिडाम, मरकोल्हे, नापोशि विनोद यादव, किषारे वैरागडे, निलेश मुडे, पुरुशोत्तम चिकाटे आनंद खरात, निलेश मुंडे,पांडुरंग वाघमोडे, सतिश अवथरे, लालु यादव, पोशि विकास जुमनाके, हिरालाल गुप्ता, संदिप कामडी, सुजीत शेंडे, मनापोशि भावना रामटेके यांनी केली आहे

About the author

लोकवाचक न्यूज

श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959

Add Comment

Click here to post a comment

error: Sorry !! Content is Copyright protected !!