पुंडलिक येवले
भद्रावती तालुका प्रतिनिधि कोरोना काळात रूग्नांची उत्कृष्ट सेवा करून कोरोना योद्धा ठरलेल्या व कर्तव्यदक्ष असलेल्या येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकिय अधिकारी डाॅ.अविशा मडावी यांची भद्रावतीच्या ग्रामीण रूग्णालयात पुन्हा नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकिय अधिकारी डाॅ. अविशा मडावी यांनी कोरोना काळात रूग्णांची चांगली सेवा केली आहे. त्यामुळेच त्या कोरोना योद्धा ठरलेल्या आहे. विशेष म्हणजे त्या गर्भवती असतांना सुध्दा दिवस असो कि राञ त्या आपले कर्तव्य पार पाडायच्या त्यांची रूग्णासोबतची वागनुक शांत खेळीमेळीची होती. रूग्णांना व रूग्णालयातील ईतर कर्मचार्यांना सुध्दा त्यांचा कोणताही ञास नव्हता. आजच्या कोरोनाच्या परिस्थिती मध्ये येथील ग्रामीण रूग्णालयाला अशाच कर्तव्यदक्ष अधिकारी व कर्मचार्यांची गरज आहे. सुमारे पंधरा दिवसाचापुर्वि एका रूग्णाला छातीत दुखत असल्यामुळे येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता. डाॅ.अविशा मडावी राञी उठुन त्या रूग्णालयात आल्या यांनी प्रथम त्या रूग्णाला धिर देवुन त्याची तपासणी केली. व त्याचावर उपचार केले. त्यामुळे तो रूग्न बरा झाला. विशेष म्हणजे त्या रूग्णाला चंद्रपुरला हलविण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु डाॅ. आयशा मडावी मॅडम यांनी काळजी पुर्वक उपचार करून औषधी दिल्याने त्या रूग्णाला बरे वाटायला लागले. यावेळी परिचारिका अर्चना कुकूडकर व कर्मचारी अतुल सारससर यांनीही डाॅ.मडावि यांना चांगले सहकार्य केले. त्यामुळे अशा कर्तव्यदक्ष अधिकारी डाॅ.अविशा मडावी यांना पुन्हा येथील ग्रामीण रूग्णालयात नियुक्ती करण्यात यावी अशी येथील नागरिकांची मागणी आहे.
डाॅ.अविशा मडावी यांची पुन्हा नियुक्ती करा नागरिकांची मागणी


Add Comment