दारू सुरू दारू बंद
मुद्दा धरला होता रेटुन
झोपता झोपता विचार आला
साली………! या बंदित…
गावात; दारू येते कोठुन ..? धृ.
टील्लु ४०/-चा ८०/-झाला
इंग्लिश अडीश्याची चारशेपन्नास..
घुट घुट घेता नड्डे खाता
नाकाले झोंबलाचं पाहिजे सुवास
पेणारे मंती कोणाकडं आहे
त्याच्यावर पडती तुटून……०१
साली……या बंदीत
गावात ; दारू येते कोठुन….।।।
गस्तीच्या चौफेर नजरा फिरती
सुनसान रस्ते कळक पहारा….
खोक्याची जागा पोत्यानं धरली
अंधारी रात तस्कराचा सहारा
रातीची झोप मोड माल येतेचोरुन
जाते गाड़ीचा टायर फुटुन…..०२
साली……या बंदीत…
गावात ; दारु येते कोठुन. …।।।?
ज्याच्याकळं व्हॅक्सिन तो पुढं
कोरोना त्याच्या मागं मागं…..
हातात अल्कोहोल सिरप घेऊन
म्हणते कोवीळ शिल्ड चे पैसे सांग
तोंडातून सलाईन रोग्याचीलाईन
जाते गळ्यातलाशेंबूड फाटून..०३
साली…..या बंदीत
गावात ; दारू येते कोठून….।।।?
एकेरी वाहतूक दुहेरी फायदा
आदेश सरकारी कळक सुरू
बिन कामाने आवश्यक काम
गरिबा रस्त्यावर नको तु फिरू
रातीची संचारबंदी १४४धारा तरी
कोणाले येत असल भेटून…०४
साली…..या बंदीत…
गावात ; दारू येते कोठून…।।।?
गावात; दारू येते कुठून……।।।?
—————————————————————————————————————————————-
श्री अमरदीप प्रल्हाद लोखंडे
आवळगाव/ ब्रह्मपुरी
तालुका:- ब्रह्मपुरी
जिल्हा :- चंद्रपूर
8308005868
सदर कविता लोकल चालीत.
Add Comment