चंद्रपूर :- दि.31/10/2020 ला सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त औद्योगिक सुरक्षा बलातर्फे राष्ट्रीय एकता दिन साजरा करण्यात आला. चंद्रपूर थर्मल पावर स्टेशन मधे कार्यरत असलेल्या सुरक्षा बलाच्या सदस्यांनी कॅरोना महामारी च्या बचाव हेतूने संपूर्ण नियमाचे पालन करीत ह्या सायकल रॅली चे आयोजन करण्यात आले.कॅरोना संदर्भात लोकांन मध्ये जनजागृती व्हावी हे ह्या रॅली चे उद्धिष्ट होते. ह्या सायकल रॅली ची सुरवात दुर्गापूर गावातून, दुर्गापुर पोलीस स्टेशन, कोयना गेट पासून सि टी पी स वसाहितीतून खिरगाव, आभोरा ते पर्यावरण चोक वरून मेन गेट वर संपन्न करण्यात आले. सायकल रॅली ने जवळपास 20 किमी चा प्रवास करीत कॉविड-19 संदर्भात जनजागृती केली.
ह्या सायकल रॅली मध्ये औद्योगिक सुरक्षा बलाचे उप कामंडन्ट श्री पुष्पेंद्र सिंग, श्री सतीश मिना, श्री तेजपाल सिंग व अन्य 36 कर्मचारी सहभागी झाले होते.
Add Comment