आज दिनांक ०७/१२/२०२० रोजी पोलीस अधीक्षक चंद्रपुर श्री. अरविंद साळवे यांचे अध्यक्षताखाली पोलीस अधीक्षक कार्यालय चंद्रपुर येथे जिल्हयातील जेष्ठ नागरीक समितीची बैठक आयोजीत करण्यात आली.
सदर बैठकीत जिल्हयातील ७५ वर्षेवरील जेष्ठ नागरीकांना देनंदीन व्यवहार करतांना/वावरतांना वयोमानानुसार काय काळजी घ्यावी आणि काही चुकीचे व्यवहार झाल्यास तात्काळ काय मदत करता येईल याबाबत उपस्थित सदस्यांना विशेष मार्गदर्शन करण्यात आले. शिवाय आजारासंबंधी अचानक प्रकृती विघाडल्यास तातडीने मदत करता यावी तसेच ७५ वर्षे गाठली की कधीकधी वयोमानानुसार त्यांना विस्मरण होउ शकते अशा वेळेस त्यांना व्यवस्थित सुखरूप त्यांच्या पत्यावर त्यांचे घरी सोडता यावे, सर्व बांबीवर विशेष लक्ष देवुन जेष्ठ नागरीकांसाठी ओळखपत्राचे वाटप करण्यात आले.
सदर बैठकीत जेष्ठ नागरीक समितीचे अध्यक्ष पोलीस अधीक्षक श्री. अरविंद साळवे, पोलीस निरिक्षक स्थागुशा श्री. बाळासाहेब खाडे, पोलीस निरिक्षक वाहतुक शाखा श्री. यादव, भरोसा सेल प्रभारी श्रीमती प्रभावती ऐकुरके, समाज कल्याण निरिक्षक पुणम आसेगावकर, उपाध्यक्ष जेष्ठ नागरीक मंडळ श्री. गोसाई श्रावण बलकी, श्री. वासुदेव सादमवार, सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक चंद्रपुर श्री. श्रीराम तोडासे, श्री. रमेश कासुलकर, एनजीओ वरदविनायक शिक्षण प्रसारण मंडळ चंद्रपुर यांची प्रामुख्याने उपस्थित होती.
तसेच सदर बेठकीत उपस्थितांना आवाहन करण्यात आले की, कोरोना विषाणु पासुन बचाव करण्याकरीता जेष्ठ नागरीकानी विशेष काळजी घ्यावी आणि नियमित मास्कचा वापर करावा. आणि सर्व जनतेना आवाहन करण्यात येत आहे की, आपणाला जेष्ठ नागरीक काही समस्येत किंवा काही दुर्व्यवहार होताना दिसल्यास त्यांची तात्काळ मदत करावी त्यांचा सन्मान करावा.
Add Comment