Breaking News पोलीस रिपोर्टर

खळबळजनक – दारुड्या मुलाचा वडिलांनीच केला खून

Durgapur police arrested the accused in 24 hours

चंद्रपूर : पोंभूर्णा तालुक्यातील मोहाडा (रै) येथील जन्मदात्या बापाने पोटच्या मुलाचा खून केल्याची घटना गुरूवारच्या रात्री 9 वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. समीर कन्नाके वय 20 वर्ष असे मृतकाचे नाव असून घरगुती वादातून हा रक्तसंहार घडला आहे. सदर घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
पोंभूर्णा तालुक्यातील मोहाडा (रै.) येथील बंडू शिवराम कन्नाके याचे आपला मुलगा समीर कन्नाके वय 20 वर्षे यांचे सोबत मुलगा दारूच्या आहारी गेल्यामुळे पटत नव्हते. बापाचे व मुलाचे रोज भांडण होत होते. दिड महिण्यापुर्वी मृतक समीर
याने आपल्या बापाला बेदम मारहाण केली होती. यात वडिल गंभीर जखमी झाला होता. व त्याला नागपूर येथे वैद्यकीय उपचारासाठी हलविण्यात आले होते. तो काही दिवसांपूर्वीच मोहडी येथे आला होता.
मुलाचे झालेल्या भांडणामुळे पटत नसल्यामुळे तीन दिवसांपासून तो आपल्या
शेतातील खोपडीत पत्नी व मुलीसोबत राहत होता. मृतक समीर हा गावातील घरात एकटाच राहत होता. घटनेच्या दिवशी मृतक समीर हा शेताकडे गेला त्याचे वडिलांसोबत कडाक्याचे भांडण झाले. भांडणाचे रूपांतर हाणामारीत झाले. रागाच्या भरात जन्मदात्या बापाने पोटच्या मुलाला बंडिच्या उबारीने डोक्यात वार केला यात समीर जागीच ठार झाला. घटनेची माहिती मिळताच पोंभुर्ण्याचे ठाणेदार धर्मेंद्र जोशी व उपविभागीय पोलिस अधिकारी मल्लीकार्जुन इंगळे घटनास्थळी दाखल झाले.

error: Sorry !! Content is Copyright protected !!