Breaking News चंद्रपूर जिल्हा घडामोडी

खळबळ जनक घटना – वरोऱ्यात पेशाच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या…

वरोरा –

मित्राकडे असलेले उधारीचे पैसै वारंवार तगादा लावूनही न मिळाल्याने व पैशाची मागणी केली असता शिवीगाळ केल्याने संतापलेल्या मित्राने धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून ठार मारले. ही घटना गुरुवारी दुपारी ५.३० वाजताच्या सुमारास स्थानीक गांधी चौकात घडली. वरोरा पोलिसांनी आरोपीला अटक केली असून तपास सुरू आहे.



आधिक माहिती नुसार वरोरा शहरात व तालुक्यात अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात प्रमाणात सुरू असून आपसी स्पर्धेतून एकमेकांविरूदध शह व मातचा खेळ सुरू आहे. यातच आज दिनांक १३ मे ला दुपारी ५.३० वाजताच्या सुमारास शहरातील गांधी चौकात निलेश पुरुषोत्तम ढोक रा. पावना (वय 19 वर्षे) या युवकाने आपल्या मित्र सुकराम वसंता आलाम (वय २६ वर्षे ) रा.पावना याच्यावर चाकूने हल्ला करून ठार मारले.



निलेश ढोक याचे आपल्याच गावातील मित्र सुकराम आलाम याच्यावर दोन हजार रुपये उधार असल्याचे बोलले जाते. निलेशने आपल्या पैशासाठी सुकराम कडे वारंवार तगादा लावला परंतु सुकरामने पैसे देण्याचे टाळले. अशातच निलेशने सुकरामला गांधी चौकात बोलावले. तेथे दोघात पैशाचे वरून भांडण झाले. सुकरामने शिवीगाळ केल्याने संतापून निलेशने धारदार शस्त्राने सुकरामचा गळा कापला. तद्नंतर घाबरून जाऊन शेवटी निलेशने सुकरामला उपजिल्हा रुग्णालयात भरती केले. परंतु तोपर्यंत त्याची प्राणज्योत मावळली होती. घटनेची बातमी पोलिसांना कळताच पोलीस घटनास्थळावर पोहोचले त्यांनी आरोपी निलेश ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.
















About the author

लोकवाचक न्यूज

श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959

Add Comment

Click here to post a comment

June 2022
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
error: Sorry !! Content is Copyright protected !!