चंद्रपूर – शहरातील आझाद बगीचाच्या बाजुला असलेल्या रघुवंशी कॉम्प्लेक्स येथे असलेल्या हॉटेल मधे आज्ञात बुरखाधारी व्यक्तीने गोळीबार केला ह्यात आलेवार नामक व्यक्ती गंभीर जखमी झाला असुन त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गोळीबार होताच सदर व्यक्ती स्वतःचा जीव वाचविण्यासाठी शेजारीच असलेल्या एम आय मोबाईल शोरूम मधे दडून बसला. दरम्यान आरोपी पळुन जाण्यात यशस्वी ठरला असुन ह्या प्रकरणाचे तार बल्लारपूर शहराशी जोडल्या गेले असल्याचा संशय व्यक्त केल्या जात आहे.
गोळीबाराची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेडकर, शहर पोलीस निरीक्षक बहादुरे व पोलीस घटनास्थळी दाखल झाली असुन पोलीस आरोपीचा शोध घेत आहे .
खळबळजनक घटना – चंद्रपूर शहरात भर दिवसा गोळीबाराचा थरार


Add Comment