महाराष्ट्र सामाजीक

‘शिवचरित्र’फक्त वाचण्याचा नाही,जगण्याचा विषय आहे.

ब्रम्हपुरी/
“शिवचरीत्रातून प्रेरणा घेत माणुस आपल्या आयुष्यात यशस्वी होऊ शकतो,ही ताकद शिवचरित्रामध्ये आहे.त्यामुळे शिवाजी महाराजांची जयंती नाचून नाही तर वाचून साजरी केली गेली पाहिजे”असे प्रतिपादन युवा व्याख्याते तथा पत्रकार राहुल मैंद यांनी केले.
ते कुळवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ब्रम्हपुरी शहरातील कुर्झा वार्ड येथे आयोजित शिवजन्मोत्सव कार्यक्रमात प्रमुख वक्ता म्हणून बोलत होते.
याप्रसंगी विचारपीठावर ब्रम्हपुरी नगरपरिषदेचे गटनेता तथा बांधकाम सभापती विलास विखार, देसाईगंज न.प. येथील सहाय्यक निरीक्षक दिनकर खेत्रे, माजी पोस्टमास्तर रामकृष्ण खेत्रे हे यावेळी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलतांना नगरपरिषदेचे गटनेता विलास विखार हे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करून नागरिकांनी आपल्या आयुष्यात वाटचाल करावी. त्यामुळे आपण नक्कीच यशस्वी व्हाल असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सुखदेव खेत्रे यांनी केले.कार्यक्रमाला वार्डातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते

About the author

लोकवाचक न्यूज

श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959

Add Comment

Click here to post a comment

error: Sorry !! Content is Copyright protected !!