शेगांव बू – प्रतिनिधी .
वरोरा तालुक्यातील शेगाव ग्रामपंचा यत सर्वात मोठी ग्रामपंचायत असून येथे १३ सदस्य आहेत तर या वर्षी s c. राखीव जागा निघाल्याने यात निवडून आलेले श्री सिद्धार्थ सदाशिव पाटिल हे सरपंच पदी विराजमान झाले तर दुसरी लढत उपसरपच पदाची असल्याने या पदासाठी मोठी तारेवरची कसरत करावी लागली असून यात बहुमत सौ साधणा नितीन मानकर . यांना प्रदान करण्यात आले ..
व उर्वरित ११ उमेदवार श्री यशवंत लोडे , मनीषा विजय घोडमरे , कविता मोहन निखारे , प्रफुल विलास वाढाई, रेखा कवडू दडमल , सागर मारोती कामडी , मायाबाई कैलास तडस , सतीश नारायण गायकवाड , शंकर विश्वनाथ घोडमारे , माया नानाजी आत्राम , जोषना शंकर फुलकर , यांची सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली .
तर सर्व नव निर्वाचित सदस्य पदाधिकाऱ्यांचे गावकऱ्यांनी पुष्पगुच्छ मिठाई चारून अभिनंदन केले . यावेळी गावातून भव्य मिरवणूक काढून फटाक्याची आतषबाजी करण्यात आली .
Add Comment