महाराष्ट्र सामाजीक

वाहनासह सव्वा सहा लाखांचा मुद्देमाल जप्त. अहेरी पोलिस व मुक्तिपथची संयुक्तपणे कारवाई…

अहेरी – अहेरी पोलिस व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्तपणे 30 एप्रिल रोजी कारवाई करीत आलापल्ली शहरातून जाणार्‍या एका वाहनासह 5 लाख 87 हजार 500 रुपयांचा तंबाखू व पन्नी जप्त करण्यात आली. तसेच एका व्यापाऱ्याकडून 29 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल असे एकूण 6 लाख 16 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.



याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीच्याआधारे अहेरी पोलिस व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्तरित्या आलापल्ली येथील दिपक किराणाची तपासणी केली असता त्याक्षणी गोदामात 29 हजार 750 रुपयांचा तंबाखू आढळून आला. हा माल चंद्रपूर येथून आला असून तंबाकूजन्य पदार्थ आणून देणारे वाहन शहरात दाखल असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.



त्यानुसार त्या वाहनाचा शोध घेत आलापल्लीतील मुख्य रस्त्यावर अशोक लेयलॅंड कंपनीच्या वाहनाला अडवून तपासणी करण्यात आली. दरम्यान वाहनात 2 लाख 50 हजारांचा तंबाखू व 30 हजार 500 रूपयांची पाच पोते पन्नी ची आढळून आली. पोलिसांनी वाहनासह एकूण 6 लाख 16 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी आलापल्लीतील एका व्यावसायिकांवर व वाहन चालकावर अहेरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हि कारवाई पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पडोळे यांच्यासह पोलिस कर्मचारी व मुक्तिपथ तालुका संघटक केशव चव्हाण, तालुका प्रेरक मारोती कोलावार यांनी केली.








About the author

लोकवाचक न्यूज

श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959

Add Comment

Click here to post a comment

June 2022
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
error: Sorry !! Content is Copyright protected !!