चंद्रपूर : – स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर येथे मा. पोलीस अधिक्षक श्री. अरविंद साळवे साहेब यांचे आदेशाने पोलिस निरीक्षक श्री बाळासाहेब खाडे यांचे नेतृत्वात अमली पदार्थ विरोधी पथक स्थापन करण्यात आले असुन सदर पथकास दि. 11/03/2021 रोजी गोषणीय बातमीदाराकडून खात्रीशीर खबर मिळाली की, अमरावती येथील गांजा पुरवठा करणारे तस्कर चद्रपुर येथे गाजा घेदुन येत आहेत अशी खबर मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नागपुर रोडवर राहुल धाव्यासमोर टोल नाकयाजवळ सापळा रचला असता त्यांना खबरेप्रमाणे एका बजाज विकात मोटर सायकल वर तिन संशवीत इसम येताना दिसले पथकाने त्याचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतल. व त्याची झडती घेतली असता त्यांचे ताब्यातील मोटर सायकल चे डिक्कीमध्ये एका प्लैस्टीक मध्ये व्यवस्थीत रित्या पॅक केलेला 6 किलो 240 ग्रॅम उम्र वास असलेला ओलसर गांजा मिळुन आल्याने स्थानिक गुन्हें शाखेच्या पथकाने सदर गाजा व आरोपीचे ताब्यातील मोबाईल व वाहतुकी करीता वापरलेली मोटर सायकल असा एकुण 1.35,880/-रु. चा माल जप्त करून घेतला
ताब्यात घेण्यात आलेले दोन आरोपी है अमरावती येथील असुन एक आरोपी चंद्रपुर येथील आहे त्याचे नाव 1) गोलु उर्फ निलेश ब्रिजलाल साहु वय 28 वर्ष रा रतनगज अमरावती 2) शेख हारूण शेख मोहमद यय 52 वर्ष रा. खगड खिडकी चंद्रपुर 3) आसीफ शेख शेख मुज्जु यय 45 वर्ष रा. सादनगर अमरावती असे असुन तिनही आरोपीविरूदध पो.स्टे. रामनगर येथे अप क. 280/ 2021 कलम 8 ( क ) 20 (ब) ॥ (वाएन डी पी एस अॅक्ट अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास सुरू आहे.
सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री अरवींद साळवे अपर पोलीस अधिक्षक श्री प्रशात खैरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री बाळासाहेब खाडे यांचे नेतृत्वात सपोनि जितेन्द्र बोबडे , पोउपनि संदीप कापडे, सचिन गदादे, सफी नितीन जाधव राजेन्द्र खनके, महेंद्र भुजाड , जमीरखान पठान, अनुप डांगे, मिलींद चौव्हाण संदिप मुळे, अमोल धदरे, याचे पथकाने असुन सदर पथकाने केली असुन दोनच दिवसाअगोदर याच पथकाने वरोरा नाका पुलीयाजवळ एका ईसमास बाउनशुगर सह पकडुन कार्यवाही केली असुन तिन आरोपींना अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या या धडक कार्यवाहीमुळे अमली पदार्थ विक्री करणाऱ्या गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे.
Add Comment