चंद्रपूर – वरोरा तालुक्यातील टाकळी नाल्याला पूर आला असता ऑटो चालकाने पुल ओलांडण्या चा प्रयत्न केला. ह्यात टाकळी ते पानवडाळ्याकडे जाणारा आटो पाण्याचा प्रवाह खुप असल्याने तो वाहुन जाऊ लागला.त्या आटो मध्ये ५ लोक होते आणि ते ऑटो चे वरती चढून मदतीला आवाज देत होते. पण पाण्याचा प्रवाह खुप जोरदार असल्याने कोणीही पाण्यात जायला भित होते. अशातच बचाव कार्य मदतीला इंडिअन् आर्मी चे जवान निखिल सुधाकर काळे हे १ महिण्याच्या सुट्टी काढून गावाला येऊन होते. त्यांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता व आपले कर्तव्य जोपासत त्या पाच लोकांचा जिव वाचवला आणि दोन्ही गावच्या व्यक्तीनी पण मदत केली.
त्याच्या कार्याबद्दल निखिल काळे ह्याचे सर्वत्र कोतुक केले जात आहे.
*पुरात वाहून जाणाऱ्या पाच लोकांचे सैनिकाने वाचविले प्राण*


Add Comment