भद्रावती :-येथील आयुध निर्माणी मध्ये दारुगोळ्याचा टाकाऊ स्पोटक माल निकामी करीत असताना त्या स्फोटकांचा अचानक भडका झाल्याने कर्तव्यावर असलेला एक कामगार जखमी झाल्याची घटना ९ वाजून ३० मिनिटाचा सुमारास युनिट क्रमांक ३ जवळील बर्निंग ग्राऊंडवर घडली.
निर्माणीतील युनिट ९ मधील कार्यरत लक्ष्मीकांत गजानन आकेवार राहनार किल्हावार्ड भद्रावती असे जखमी कामगाराचे नाव असून तो आज दिनांक १२ जानेवारी ला आपल्या युनिट ९ मधील दारुगोळ्याचा टाकाऊ माल नष्ट करण्याचे काम पार पाडीत असताना तेथील टाकाऊ स्फोटकांचा अचानक भडका घेतल्याने तो गंभीर जखमी झाला त्यात त्याच्या शरीराला गंभीर इजा पोहोचल्याने त्याला सर्वप्रथम आयुध निर्माणीच्या रुग्णालयात नेण्यात आले. नंतर त्याला उपचारासाठी नागपूर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. वृत्त लिहीत असताना याबाबतची अधिक ची माहिती निर्माणी प्रशासनाकडून जाणून घेण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रशासनाशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही
Add Comment