चंद्रपूर जिल्हा घडामोडी विदर्भ

राज्य उत्पादन शुल्क विभागाची दारू तस्करी वर धडाकेबाज कार्यवाही…

चंद्रपूर:-आज रोजी वाहन क्रमांक एमएच ३४ के ६१९९ सिल्वर रंगाची इंडिगो चारचाकी वाहनाने अवैधरित्या दारुसाठा घेउन चंद्रपुर शहरात येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली अशा गुप्त माहितीचा आधारे पहाटे ०५ वाजता सहकारी स्टाफसह पडोली टी पॉइन्ट पाळत ठेवली असता सदर वाहन नागपुर रोडने येत असल्याचे दिसले. सदर वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला असता सदर वाहनचालक वाहन न थांबविता भरधाव वेगने चंद्रपुर शहराकडे निघाला. सदर वाहनाचा पाठलाग केला असता वाहनचालक रामनगर पोलीस स्टेशन हद्दीतील लखमापुर हनुमान मंदीरच्या रोड ने गल्ली मध्ये वाहन उभे करुन पसार झाला सदर वाहनाची दारुबंदी कायद्या अंतर्गत झडती घेतली असता सदर वाहनामध्ये मागच्या सीटवर व डिक्कीत रॉकेट देशी दारु संत्रा या ब्रॅन्डच्या ९० मीली क्षमतेच्या एकुण ३० बॉक्स जप्त केले. वाहनासहीत दारुची एकुण रु. २,७८,०००/- किंमत मुददेमाल जप्त केला व सदर पसार झालेल्या इसमा विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (अ) (ई) अन्वये कार्यवाही केली. पुढील तपास सुरु असून सदर ची कार्यवाही. सागर धोमकर अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, चंद्रपुर यांचे मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क,भरारी पथक,चंद्रपुर/ गडचिरोली विभागाचे प्रभारी निरीक्षक, अमीत क्षिरसागर, तसेच विभागाचे जवान चेतन अवचट, सुदर्शन राखुंडे व जगन पुटटलवार यांनी कार्यवाही पार पाडली.

About the author

लोकवाचक न्यूज

श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959

Add Comment

Click here to post a comment

June 2022
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
error: Sorry !! Content is Copyright protected !!