चंद्रपुर :
24000 कोटीपेक्षा जास्त तुटीचा 2022-2023 असा हा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मा.अर्थ मंत्री यांनी आज सादर केला.
सर्वसामान्य लोकांना केंद्र स्थानी ठेऊन, सर्वंच क्षेत्राला भरीव निधी देऊन एकप्रकारे समन्वय साधण्याचा प्रयत्न झाला. कृषी, शिक्षण, आरोग्य, ऊर्जा, रस्ते वाहतूक, उद्योग, सहकार, महिला व बालविकास, नगर रचना, नियोजन, पर्यटन, पर्यावरण, परिवहन, सिंचन, आदिवासी व शेतकरी कल्याण, इत्यादी साठी भरीव निधीची तरतूद करून कोरोना व जगातील आताच्या युद्धजन्य परिस्थितीत महाराष्ट्राच्या विकासासाठी व हितासाठी चांगला प्रयत्न आहे असे डॉ अशोक जीवतोडे, ओबीसी नेते यांनी म्हटले.
सर्वसमावेशक अर्थसंकल्प राज्य शासनाने सादर केला : ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे


Add Comment