महाराष्ट्र सामाजीक

सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीचे थकित मानधन मिळण्याबाबत पुरोगामी शिक्षक संघटनेचे तहसीलदारांना निवेदन

पुंडलिक येवले
तालुका प्रतिनिधी, भद्रावती

ग्रामपंचायत निवडणूक 2021 करिता सेवा देणारे तालुक्यातील शिक्षक कर्मचाऱ्यांचे निवडणूक मानधनाची रक्कम आजतागायत न मिळाल्याने महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा भद्रावती तर्फे माननीय तहसीलदार साहेब भद्रावती यांना मानधन लवकरात लवकर मिळण्याबाबत निवेदन देण्यात आले या संदर्भाने माननीय जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या कार्यालयाने जिल्ह्यातील सर्व तहसीलला पुरवण्यात आलेल्या मानधनातून सर्वप्रथम ग्रामपंचायत निवडणुकीत सेवा देणारे कर्मचाऱ्यांचे मानधन द्यावे, हे करण्याबाबतचे पत्र जिल्ह्यातील सर्व तहसीलदार कार्यालयास पाठवलेले आहे , या अनुषंगानेच भद्रावती तालुक्यात 57 ग्रामपंचायतीचे निवडणूक पार पडल्या या निवडणूक कार्यक्रमात तालुक्यातील अनेक शिक्षक तथा शिक्षिकांनी मतदान अधिकारी, केंद्राध्यक्ष म्हणून काम पार पाडले या कार्याचे मानधन स्वरूपात मिळणारी रक्कम अजूनही वाटप करण्यात आलेली नाही, तरी ती रक्कम लवकरात लवकर वाटप करण्यात यावे, या मागणी चे पत्र तालुका संघटनेतर्फे माननीय तहसीलदार यांना देण्यात आले यावेळी संघटनेचे अध्यक्ष जगदीश ठाकरे, तालुका नेता राजीव कुटेमाटे, कार्याध्यक्ष गणेश दुधलकर ,सचिव अजय मुसळे उपाध्यक्ष, विलास कुळमेथे ,दिलीप आस्वले ,प्रदीप आगलावे ,सुभाष सोमलकर ,विश्वेश्वर इस्टाम आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

About the author

लोकवाचक न्यूज

श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959

Add Comment

Click here to post a comment

July 2022
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
error: Sorry !! Content is Copyright protected !!