चंद्रपूर जिल्हा घडामोडी

कोरोना काळात शेतकरी आणि महिलांवरील मायक्रो फायनान्स व अन्य कर्ज वसुली थांबवा :- दिक्षा पाटील

चिमूर:-

देशात आणि राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली असून कोरोना रोगाचा कहर सुरू असून सर्व जनता प्रभावित झाली असून सर्वत्र हाहाकार माजला आहे. या रोगाला प्रतिबंधित करण्यासाठी शासनाने अनेक उपाययोजना करून संचारबंदी लाकडाऊन केला. त्यामुळे सर्व जनजीवन स्तब्ध झाले आहे. शेतकरी आणि मजूर यांच्या हाताला काम नाही. यावर्षी शेतात रोगराई व अल्पपर्जन्य यामुळे पीक गेले उत्पन्न झाले नाही शेती करण्यासाठी शेतकऱ्यांनी काही खाजगी मायक्रो फायनान्स व अन्य बँका तील कर्ज घेतले होते. त्या कर्जाची वसुली करण्यासाठी कर्मचारी नेरी वरून जवळ असलेल्या लोहारा आणि परिसरातील गावात येत आहेत.


आधीच कोरोना असल्यामुळे शेतकरी महिलावर्ग व मजूर वर्गाच्या हाताला काम नसून खान्या पिण्यासाठी कसरत करावी लागत आहे. तेव्हा या कोरोना काळात प्रशासनाने जातीने लक्ष घालून ही कर्ज वसुली थांबवावी अशी मागणी लोहारा ग्रा प चे सरपंच सौ दिक्षाताई शैलेंद्र पाटील यांनी केली आहे. 


     शेती कसण्यासाठी शेतकरी वर्ग महिला वर्ग समूह तयार करून काही खासगी बँकामधून कर्ज घेत असतात अनेक मायक्रो फायनान्स बँका शेतकऱ्यांना महिलांना कर्ज देत असतात आणि शेतातील उत्पन्न  झाले की शेतकरी कर्जाची परतफेड करीत असतात परंतु यावर्षी उत्पन्न कमी झाल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे आणि आता कोरोनाच्या कहरामुळे जनजीवन प्रभावित होऊन जागेवरच थांबला आहे.


शेतकरी मजूर वर्ग आणि महिलावर्ग यांच्या हाताला काम नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. समोर शेती कशी करायची आणि कुटूंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा हा यक्ष प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाला आहे. तेव्हा प्रशासनाने जातीने लक्ष घालून ही कर्ज वसुली थांबवावी अशी मागणी सरपंच दिक्षाताई पाटील यांनी केली आहे. 

















About the author

लोकवाचक न्यूज

श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959

Add Comment

Click here to post a comment

June 2022
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
error: Sorry !! Content is Copyright protected !!