प्रसस्तीपत्र वाटप
चिमूर तालुका प्रतिनिधी सुरज नरुले
चिमूर तालुका कुणबी समाज संघटन चे वतीने संत तुकाराम महाराजाची जयंती साजरी करण्यात आली असून यावेळी कोरोना काळात कुणबी समाजबांधवांनी सामाजिक कार्य केल्याने समाजबांधवांचे तहसील प्रशासन च्या वतीने प्रसस्तीपत्र देऊन गुण गौरव करण्यात आले
संत तुकाराम महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी एसडीओ सकपाळ तहसीलदार सूर्यवंशी उपस्थित होते कोरोना काळात कुणबी समाज मधील कार्यकर्त्यांनी जीवाची पर्वा न करता समाजहिताचे कार्य केल्याने त्यांना एसडीओ व तहसीलदार यांच्या हस्ते प्रसस्तीपत्र देण्यात आले
यावेळी कुणबी समाज तालुका अध्यक्ष विनोद अढाल ,महिला तालुका अध्यक्ष सौ ज्योती ठाकरे, एकनाथ थुटे, गजानन शिंदे,विलास वडसकर, विलास धोटे, पवन कारेकर नीलकंठ धोटे, रमेश कराळे वैभव लाडगे, सुरज नरुले प्रशांत लडी, नीता लांडगे,सुनीता कराळे राणी थुटे अरुणा उरकुडे मंगला धोटे कल्पना रोकडे हर्षा वैध उपस्थित होते.
Add Comment