पोलीस रिपोर्टर महाराष्ट्र सामाजीक

रामनगर पोलीस स्टेशनमध्ये असलेल्या दुचाकी वाहनाच्या लिलावासाठी निविदा आमंत्रित…

चंद्रपूर: चंद्रपूर शहरातील रामनगर पोलिस स्टेशन येथे बऱ्याच कालावधीपासुन दुचाकी वाहने जमा आहेत. उपविभागीय दंडाधिकारी, चंद्रपुर यांच्या आदेशान्वये कोणीही व्यक्ती सदर वाहनांबाबत त्यांचा हक्क सांगण्यासाठी किंवा प्रस्थापित करण्यासाठी हजर न झाल्याने महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 87 अन्वये सदर वाहनांचा पोलीस चौकी, चिचपल्ली येथे 24 जानेवारी 2022 रोजी लिलाव करण्यात येत आहे.
लिलावातील 79 मोटार सायकलची शासकीय किंमत 1 लक्ष 15 हजार 300 रूपये असून वाहने परिक्षणाची तसेच अमानत रक्कम 1 लक्ष 15 हजार 300 रूपये, नोंदणीची तारिख दि. 21 जानेवारी रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत भरावे लागेल. सदर वाहनांचा लिलाव दि. 24 जानेवारी रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत राहील.
या असेल लिलावासाठी अटी व शर्ती :
नमुद केलेल्या (79 मोटार सायकलची) स्थावर मालमत्तेची जशी आहे तशी, जिथे आहे तिथे व ज्या स्थितीत आहे तशी विक्री केली जाईल. लिलावाच्या वेळी व ठिकाणी लिलावाच्या तपशीलवार अटी व शर्ती वाचण्यात येईल. विक्री रक्कमेच्या 10 टक्के अमानत रक्कमेचा भरणा केल्यावर लिलाव बोली झाल्यानंतर ज्यांच्या नावाने सदर वाहनांचा लिलाव मंजुर होईल त्या खरेदीदारास उर्वरीत रक्कमेचा भरणा त्वरीत लिलावाचे ठिकाणीच भरणे बंधनकारक राहील. जर सदरचा भरणा त्वरीत व मुदतीत केला नाही. तर भरलेली 10 टक्के रक्कम कोणत्याही प्रकारची नोटीस न देता जप्त करण्यात येईल व सदर मालमत्ता विक्रीची कार्यवाही पुन्हा करण्यात येईल.
वाहनाचे इंजीन व चेचीस नंबर मिटवुन, वाहनाचे तुकडे करून भंगारमध्ये विक्री करण्यात येणार आहे. जे खरेदीदार विक्री रक्कमेच्या 10 टक्के अमानत रक्कमेचा भरणा करतील फक्त त्याच खरेदीदारास विक्री बोली लिलावात प्रवेश देण्यात येईल. सदर लिलावाची बोली, ऑफर स्वीकारणे, न स्वीकारणे, लिलाव कायम करणे, पुढे ढकलने किंवा रद्द करणे तसेच ईतर कोणतेही कारण न देता सर्व अधिकार ठाणेदार पोलीस स्टेशन, रामनगर यांचे राहील. याची नोंद घ्यावी. असे पोलीस निरीक्षक राजेश मुळे यांनी कळविले आहे.

About the author

लोकवाचक न्यूज

श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959

Add Comment

Click here to post a comment

error: Sorry !! Content is Copyright protected !!