चंद्रपूर जिल्हा घडामोडी

प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील धार्मिक स्थळे व प्रार्थना स्थळे खुली करण्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता कोविड 19 बाबत सांगितलेल्या मार्गदर्शक नियमांचे पालन राहील बंधनकारक

चंद्रपूर :- राज्य शासनाने राज्यात प्रतिबंधीत क्षेत्रा बाहेरील धार्मिक स्थळे आणि प्रार्थना स्थळे 16 नोव्हेंबर पासून खुली करण्यास मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करणेच्या अटीस अधीन राहून जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी जिल्ह्यातील प्रार्थना स्थळे व धार्मिक स्थळे खुली करण्यास परवानगी दिली आहे.

प्रतिबंधीत क्षेत्रा बाहेरील धार्मिक आणि प्रार्थना स्थळांच्या वेळेबाबत संबंधीत विश्वस्त मंडळ,अधिकारी यांनी निर्णय घ्यावा. मास्क परिधान करणे, शारिरिक आंतराचे पालन करणे, थर्मल स्क्रिनिंग करणे आणि वारंवार हात धुणे किंवा सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक राहील. कोविड-19 व्यवस्थापनासाठी  शारिरिक अंतराचे व संसर्ग न पसरणेबाबत वेळोवेळी देण्यात  आलेल्या निर्देशांचे पालन करणे बंधनकारक असेल असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे. आदेशाचे पालन न करणा-या कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समुह हे साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंड संहिता 188 नुसार कारवाई करण्यात येईल.

धार्मिक स्थळे , प्रार्थना स्थळे याठिकाणी संसर्ग रोखण्यासाठी मानक कार्यप्रणाली

व्याप्ती-

कंन्टेनमेंट झोनच्या आतील धार्मिक स्थळे / प्रार्थना स्थळे ही नागरिकांसाठी बंद राहतील. फक्त कंन्टेनमेंट झोनच्या बाहेरील धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे सुरू करणेस परवानगी असेल.

सामान्य प्रतिबंधात्मक उपाययोजना-

१) 65 वर्षावरील जेष्ठ नागरिक, इतर आजाराने ग्रस्त व्यक्ती, गरोदर महिला आणि 10 वर्षाखालील लहान मुले यांनी घरीच राहावे. धार्मिक / प्रार्थना स्थळांचे व्यवस्थापन करणाऱ्या संस्था यांनी याबाबत नागरिकांना सूचना द्याव्यात.

 1. i) या सर्व सार्वजनिक ठिकाणी शक्यतोवर वैयक्तिक कमीत कमी 6 फूट शारिरिक अंतर राखणे आवश्यक असेल.

3/5

 1. ii) मुखपट्टी, मास्क यांचा वापर करणे बंधनकारक असेल.

iii) हात अस्वच्छ नसले तरी साबणाने वारंवार हात धुणे (किमान – 40 ते 60 सेंकदापर्यत) बंधनकारक असेल. त्याचबरोबर सर्व ठिकाणी अल्कोहोल युक्त हॅण्ड सॅनिटायझरचा वापर ( किमान 20 सेंकदापर्यत) करावा.

 1. iv) श्वसनसंबंधित शिष्टाचाराचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक असेल. यामध्ये शिंकताना किंवा खोकताना टिश्यू पेपर किंवा हातरूमाल किंवा हाताच्या कोपराने नाक व तोंड पूर्णपणे झाकले जाईल याची दक्षता घेणे तसेच वापरलेला टिश्यू पेपरची योग्य त्या पध्दतीने विल्हेवाट लावणे आवश्यक आहे.
 2. v) या ठिकाणी येणारे सर्व नागरिक, कामगार, भाविक,सेवेकरी यांनी स्वत:च्या आरोग्याचे निरिक्षण करणे तसेच आजारी असलेस स्थानिक प्रशासन, जिल्हा प्रशासनास कळविणे आवश्यक आहे.
 3. vi) सार्वजनिक ठिकाणी थुकण्यास पूर्णपणे प्रतिबंध असेल. तसेच याचे उल्लघंन केल्यास स्थानिक प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई केली जाईल. धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे या ठिकाणी येणाऱ्या सर्वानी आरोग्य सेतू  अँपचा वापर करावा.

सर्व धार्मिक स्थळे , प्रार्थना स्थळे या ठिकाणी  उपाययोजना कराव्यात

 1. i) सर्व धार्मिक स्थळे , प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी प्रवेशव्दारावर हात स्वच्छतेसाठी सॅनिटायझर डिस्पेंसर तसेच थर्मल स्क्रिनिंगची सोय करणे बंधनकारक असेल.

ii)धार्मिक , प्रार्थना स्थळाच्या ठिकाणी फक्त लक्षणे नसलेल्या व्यक्तींनाच प्रवेश असेल.

iii) सर्व व्यक्तींना मुखपट्टी , मास्कचा वापर केला असेल तरच या ठिकाणी प्रवेश करण्याची परवानगी द्यावी. (No Mask – No Entry)

 1. iv) सर्व धार्मिक , प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी कोव्हीड -१९ विषाणू संसर्ग रोखण्यासाठीच्या

प्रतिबंधात्मक उपायोजना पोस्टर्सच्या माध्यामातून दर्शनी भागात लावण्यात याव्यात. तसेच या ठिकाणी कोव्हीड -19 विषाणू संसर्ग रोखण्याबाबतच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना ऑडीओ व व्हिडीओच्या माध्यमातून जनजागृतीसाठी वारंवार ऐकवल्या व प्रसारित केल्या जाव्यात.

v)धार्मिक, प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी प्रवेश देणेबाबत अभ्यागत ,भाविकांबाबत निश्चित धोरण ठरवावे. त्या ठिकाणी निश्चित केलेल्या वेळेमध्ये किती लोकांना प्रवेश दिला जावा. याबाबतचा निर्णय धार्मिक, प्रार्थना स्थळांचा आकार, वायुविजन इत्यादी बाबी विचारात घेवून त्या स्थळांचे नियमन करणारे विश्वस्त / मंडळ / अधिकारी यांनी स्थानिक प्रशासनाशी चर्चा करून करावे.

 1. vi) पादत्राणे स्वत:च्या गाडीतच ठेवणेबाबत भाविकांना प्रवृत्त करावे. गरज असेल तर भाविकांनी वैयक्तिक व कुटुंबांची पादत्राणे एकत्र नेमून दिलेल्या ठिकाणी ठेवावीत.

vii) वाहन पार्किंगच्या ठिकाणी तसेच परिसराबाहेर सामाजिक अंतराच्या निकषाचे पालन करून गर्दीचे योग्य व्यवस्थापन करण्यात यावे.

viii) धार्मिक , प्रार्थना स्थळांच्या परिसरातील तसेच आवारा बाहेरील सर्व दुकाने ,स्टॉल , कॅफेटेरिया या ठिकाणी पूर्णवेळे सामाजिक अंतराचे पालन करणे बंधनकारक असेल.

 1. ix) धार्मिक , प्रार्थना स्थळाच्या परिसरामध्ये भाविकांच्या रांगांचे योग्य व्यवस्थापन करणे आणि योग्य सामाजिक अंतराचे पालन करणेसाठी योग्य मार्किग करावे.

भाविक / अभ्यागतासांठी धार्मिक / प्रार्थना स्थळांच्या परिसरामध्ये प्रवेश व बाहेर जाणाऱ्या मार्गाची वेगळयाने व्यवस्था करणे.

धार्मिक / प्रार्थना स्थळांच्या परिसरातील भाविकांच्या / अभ्यागातांच्या प्रवेशासाठीच्या रांगामध्ये किमान 6 फुटाचे शारिरिक अंतर राखले जाईल याची दक्षता घ्यावी. यासाठी धार्मिक / प्रार्थनास्थळांचे व्यवस्थापन करणारी संस्था जबाबदार असेल.

xii) धार्मिक / प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी येणाऱ्या सर्व नागरिकांनी प्रवेश करण्याअगोदर हात व पाय साबण व पाण्याने धुवावेत.

xiii) धार्मिक / प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी अभ्यागत / भाविकांना बसण्याची व्यवस्था करत असताना योग्य सामाजिक अंतर राखावे. वातानुकुल यंत्र / वायुविजनसाठी मार्गदर्शक तत्वांचे पालन करणेत यावे. वातानुकुलित यंत्रणांचे तापमान 24° C ते 30° C पर्यत राखले जाईल तसेच

सापेक्ष आर्द्रता 40-70 % पर्यंत असेल. शक्यतोवर पुरेसी ताजी खेळती हवा राहील याची काळजी घ्यावी.

xiv) पुतळे/ मुर्ती/ पवित्र ग्रंथ यांना स्पर्श करण्यास परवानगी असणार नाही.

 1. xv) धार्मिक / प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी मोठया प्रमाणात गर्दी करणेस परवानगी असणार नाही.

xvi) रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याचे दृष्टीने एकत्रितपणे गायले जाणारे भजन आरत्या  टाळाव्यात. त्याऐवजी त्या ठिकाणी रेकॉर्डींग केलेले भक्ति संगीत / गाणी यांचा वापर करावा.

xvii) एकमेकांना अभिवादन करताना शारिरिक संपर्क टाळण्यात यावा.

xviii) धार्मिक प्रार्थनेसाठी एकत्रित येवून एकच चटई / अंथरूणचा वापर करणेस परवानगी नाही.

भाविकांनी त्यांची स्वतंत्र चटई किंवा अंथरूण आणावा  व  प्रार्थनेनंतर  परत घेवून जावा.

धार्मिक / प्रार्थना स्थळांच्या आत मध्ये प्रसाद वितरण किंवा पवित्र पाणी शिंपडणे इत्यादी सारख्या शारिरिक अर्पणांना परवानगी असणार नाही.

 1. xx) धार्मिक / प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी असलेले कम्युनिटी किचन / लंगर / अन्नदान / अन्नछत्र इत्यादी ठिकाणी अन्न तयार करताना व वितरण करताना योग्य शारिरिक अंतर राखावे.

xxi) धार्मिक / प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी प्रभावी स्वच्छता व निर्जतुकीकरण करावे. विशेषत: शौचालय, हात-पाय धुण्याचे ठिकाण इत्यादी ठिकाणी स्वच्छतेबाबत विशेष लक्ष दिले जावे.

xxii) धार्मिक / प्रार्थना स्थळांच्या व्यवस्थापकाव्दारे या परिसरामध्ये वारंवार साफसफाई व निर्जतुकीकरण केले जावे.

xix)धार्मिक / प्रार्थना स्थळांच्या परिसरातील इमारतीतील जमिन, फरशी व इतर आवारात वारंवार स्वच्छता केली जावी.

xxiv) अभ्यागत / भाविक / सेवेकरी / कर्मचारी यांनी वापरलेले मास्क, चेहरा पट्टी, हातमोजे यांची योग्य विल्हेवाट लावण्याची व्यवस्था असावी.

xxv) धार्मिक / प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी काम करणारे कर्मचारी / सेवेकरी यांना कोव्हीड -19 सुरक्षा प्रोटोकॉल गरजेचा आहे. त्याचबरोबर कामावर रूजु होण्यापुर्वी व आठवडयातून एकदा कोव्हीड – 19 चाचणी करणे आवश्यक असेल.

xxvi) भोजनालय व शौचालयाच्या ठिकाणी जमावाचे नियंत्रण करणे आवश्यक असेल.

xxvii) प्रत्येक धार्मिक / प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी येणाऱ्या व्यक्तींची संख्या, जागा आणि सामाजिक अंतराचा प्रोटोकॉल पाळला जाईल याबाबत संबंधीत पोलिस अधिक्षक / जिल्हाधिकारी यांना हमीपत्र देणे बंधनकारक असेल.

आवारात बाधित किंवा संशयित आढळल्यास करावयाची कार्यवाही

अ) आजारी व्यक्तीला इतरापासून दूर असे स्वंतत्र खोलीत किंवा जागेत ठेवावे.

ब) डॉक्टरांनी तपासणी करेपर्यंत त्या व्यक्तीने मुखपट्टी चा वापर करणे बंधनकारक असेल.

क) तात्काळ जवळच्या वैद्यकीय सुविधा (हॉस्पिटल/ क्लिनिक) केंद्रात कळवावे. तसेच स्थानिक / जिल्हा मदत केंद्रास कळवावे.

ड) नियुक्त केलेल्या सार्वजनिक आरोग्य प्राधिकरणाव्दारे (जिल्हा RRT, उपचार करणारे तज्ञ) सदर रुग्णाबाबत जोखीम मूल्याकंन केले जाईल. त्यानुसार रुग्ण, त्याचे संपर्क आणि निर्जतुकीकरण याबाबत पुढील कार्यवाही केली जाईल.

इ) सदर रुग्ण कोव्हीड -19 विषाणू बाधित (पॉझिटिव्ह) आलेस सर्व परिसर निर्जतुकीकरण करणेत यावा, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

About the author

लोकवाचक न्यूज

श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959

Add Comment

Click here to post a comment

June 2022
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
error: Sorry !! Content is Copyright protected !!