महाराष्ट्र सांस्कृतीक

नेरी येथील शिक्षक आनंद बोरकर यांची कविता ठरली लक्षवेधी……

सुनिल कोसे -नेरी (चिमूर)

फिल्म दिग्दर्शक हर्षद मारोतराव रायपुरे येवली,जिल्हा-गडचिरोली यांच्या पाचव्या स्मृती दिनानिमित्त अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे,जिल्हा-चंद्रपूर,
शाखा-ब्रम्हपुरी तर्फे दिनांक २१/२/२०२१ ला “राहिले ते स्वप्न अधुरे” या विषयावर आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन काव्यलेखन स्पर्धेत राज्यभरातून १३१ कवी तथा कवयित्रीनी सहभाग नोंदविला.या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून शंकरपूरचे रहिवासी नेरी येथील शिक्षक आनंद हिरामण बोरकर
यांनी वास्तविक परिस्थितीवर लिहिलेली कविता लक्षवेधी क्रमांकांपैकी एक ठरली आहे.
आनंद बोरकर याना बालपणापासून निसर्गाप्रती ओढ आहे.जंगल सफारी,फोटोग्राफी,कविता व लेख लिहिणे हे त्यांचे आगळेवेगळे छंद असून सामाजिक कार्यात त्यांना विशेष रुची आहे.आपल्या आवडीनुसार त्यांनी व्याघ्रदर्शनावर आधारित “दर्शन सैराट वाघिणीचे” ही पहिली कविता लिहिली आणि तिथूनच आनंद बोरकर यांच्या काव्यलेखनाचा प्रवास सुरु झाला.
नेरी येथील रहिवासी जिल्हा परिषदेचे सदस्य माननीय मनोहर मामीडवार यांनी अथक परिश्रमातून घरी फुलविलेल्या बागेतील झाडांवर चिऊताईचा थवा येऊन बसायचा परंतु एके दिवशी अचानक आलेल्या वादळ व गारपिटीमुळे त्या शेकडो चिमण्यांचा घात झाला.
त्या मुक्या जीवांना झालेले दुःख निसर्गाप्रती प्रेम असणारे व कवीमनाचे आनंद बोरकर यांनी हेरले व ते आपल्या शब्दांतून कवितेच्या रूपात मांडले असता प्रस्तुत कविता लक्षवेधी ठरली.आनंद बोरकर यांनी परिसरात होणाऱ्या साहित्य संमेलनात संयोजन समितीमध्ये कार्य केले आहे तसेच अनेक ठिकाणी निमंत्रित कवीच्या रूपात सहभाग नोंदविला आहे.
स्पर्धेच्या संयोजिका म्हणून कवयित्री सोनाली रायपूरे-सहारे,परीक्षक म्हणून अमरावती येथील साहित्यिक खुशाल गुल्हाणे सर,ग्राफिक्स करिता स्नेहा मोरे यांनी भूमिका पार पाडली.
या यशाकरिता आई वडील,परिवार ,योगेश बारेकर,राकेश दडवे, अमित काटवलकर व इतर मित्रमंडळी,सहकारी शिक्षक बांधव इत्यादी सर्व स्तरावरून आनंद बोरकर यांचेवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

About the author

लोकवाचक न्यूज

श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959

Add Comment

Click here to post a comment

June 2022
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
error: Sorry !! Content is Copyright protected !!