पोलीस स्टेशन वार्ड क्र. ३ दुर्गापूर येथून दि. २१ डिसेंबर २०२० रोजी १२ ते ३ च्या दरम्यान चोरीची घटना घडली होती, घटनेचा आरोपी पृथ्वी अशोक तायडे वय २३ वर्ष रा.बेघर कॉलनी, गडचांदूर ता. कोरपना जि. चंद्रपूर या आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्यानुसार एक सोन्याचा गोफ लॉकेटसह ९ ग्रॅम कि. ४८,४८० रु., सोन्याचे चेन टॉप्स ३ ग्रॅम कि.१५१२०रु., सोन्याचे डोरल जोडी गहुमनी व पीटी व मनीपोत ४ ग्रॅम कि. २०१६० रु.,
सोन्याचे पदक गहुमनी पीटीव मन्याची पोत ८ ग्रॅम कि. ४०,३२० रु., सोन्याच डोरल १ ग्रॅम कि. ५,१००रु., सोन्याचे ९ नग पीटीव मनी व बेसर ३,०२० रु., चांदीच्या चाळ ६४ ग्रॅम, गोफ ८ ग्रॅम २ अंगठ्या ६ ग्रॅम कि. ५७७० रु. असा एकूण १ लाख ३७ हजार ९७० रुपयांचा माल चोरीस गेलेला होता. त्यानुसार चोरीस गेलेल्या मालापैकी एकूण १ लाख ३७ हजार ९७० रुपयाचा माल आरोपीकडून जप्त करण्यात आला आहे आरोपीवर अप क्र. ४३१/२० कलम ३८० भादवी. कलमेनुसार कारवाई झाली असून पुढील तपास सुरू आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर उप अधीक्षक प्रशांत खैरे , शिलवंत नांदेडकर,पो.नी. स्वप्निल धुळे सा. यांचे मार्गदर्शनात पोउपनी प्रविण सोनोने पोहवा सुनिल गौरकार, पोशि मनोहर जाधव, पोशि सुरज लाटकर, यांनी केली.
Add Comment