क्राइम महाराष्ट्र

खुन करणाऱ्या तिन आरोपीस जन्मठेपेची शिक्षा आणि दंड

चंद्रपूर – पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर परिसरात शुल्लक कारणावरून खुन करणाऱ्या आरोपीस १५/११/ २०२१ रोजी मा. श्री. वि.द.केदार, जिल्हा व सत्र न्यायाधीश चंद्रपुर यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर हद्दीतील आरोपीतांनी संगणमत करुन मृतक झुनमुलवार व फिर्यादी यांना म्हटले की, आमच्या फॅमीली मॅटरमध्ये येवु नका असे म्हणुन आरोपी शिवा यांने संतुला जास्त सपोर्ट करीत आहे. तुझी मस्ती काढतो असे म्हणुन संजु यांच्या अंगावर गेला असता फिर्यादी राजु हा झगडा सोडविण्यास गेला असता आरोपी शिवा याने त्याच्या हातात असलेल्या कोबडे लढविण्याच्या कातीने फिर्यादीला जखमी केले. त्यानंतर आरोपी राम व लक्ष्मण कोटा याने संजुला पकडुन ठेवले व आरोपी शिवा यांनी संजुच्या पोटावर व इतरत्र कातीने मारुन जखमी केले. राम कोटाची पत्नी संतोषी हिने सुध्दा व इतर आरोपीतांनी मृतक संजुला हाताबुक्कानी मारहाण केली. उपचारा दरम्यान संजु झुनमुलवार मरण पावला. अशा फिर्यादीच्या रिपोर्टवरून पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर येथे अप.क. ४५७/२०१९ कलम ३०२,३२४,३४ भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.सदरचा गुन्हा तपासात घेतल्यानंतर तत्कालीन तपासी अधिकारी पोउपनि. व्हि.के. कोरडे, पोस्टे चंद्रपुर शहर यांनी आरोपी निष्पन्न करून आरोपीविरूध्द सबळ पुराव्यानिशी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. न्यायालयाचे सुनावणी दरम्यान सदर प्रकरणात न्यायालयाने साक्षीदारतपासले व योग्य पुराव्याच्या आधारे दिनांक १५/११/२०२१ रोजी आरोपी नामे कं. १). शिवा उर्फ गोलु पेराबोइनवार, वय २२ वर्षे, २) रामा रायमल्लु कोटा, वय ४०वर्षे, ३) लक्ष्मण रायमल्लु कोटा, वय ३५ वर्षे, ४) संतोषी राम कोटा, वय ३५ वर्षे सर्व रा. लालपेठ कॉलरी नं. १ चंद्रपुर यातील आरोपी कं. १ ते ३ यांना कलम ३०२,३४ भादंवि मध्ये जन्मठेपेची व ५,००० रू दंडाची शिक्षा, दंड न भरल्यास अतिरिक्त १ वर्षाचा कारावास त्याचप्रमाणे आरोपी कं. १) शिवा यास कलम ३२४ अंतर्गत २ वर्षांचा कारावास तसेच १,००० / – रु दंड, दंड न भरल्यास ६ महीण्याचा कारावास ठोठावण्यात आला तसेच आरोपी कं. ४) संतोषी राम कोटा यांचेविरुध्द ठोस पुराव्याच्या अभावी निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. सदरची शिक्षा मा. श्री. विरेन्द्र द. केदार, जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी ठोठावली आहे. सदर प्रकरणामध्ये सरकार तर्फे अॅड. श्री. संदीप नागपुरे, सरकारी अभियोक्ता, चंद्रपूर आणि कोर्ट पैरवी म्हणुन पोहवा. संतोष पवार, पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर यांनी काम पाहिले आहे.


About the author

लोकवाचक न्यूज

श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959

Add Comment

Click here to post a comment

error: Sorry !! Content is Copyright protected !!