स्थानिक शेगाव बू येथील प्राथमिक आरोग्य केंद्र शेगाव ची नवीन इमारत अनेक वर्षांपासून धूळ खात पडली असून शासनाचे करोडो रुपये या नवीन वास्तू तयार करण्याकरिता लागले असून प्राथमिक आरोग्य केंद्र ची नवीन इमारत मोठ्या थाटाने उभी असून या इमारती चे उद्घाटन करण्या करिता शासनाला मुहूर्त मिळत नसल्याने याचा फटका येथील तसेच परिसरातील गरीब जनतेला सहन करावा लागत आहे …. तेव्हा अश्या अनेक समस्या लक्ष्यात घेऊन या नवीन इमारत चे उद्घाटन करून तात्काळ जनतेच्या व रुग्णाच्या सेवे करिता उपलब्ध करून द्यावे या करिता झोपलेल्या आरोग्य विभागाला जागे करण्यासाठी शेगाव येथील प्रहार जन शक्ती पक्षाचे वतीने मुंडण आंदोलन नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीच्या भव्य प्रांगणात हे आंदोलन करण्यात आले … सदर आंदोलन प्रहार सेवक श्री अक्षय बोंदेगुलवार किशोर डुकरे .शेरखान पठाण. यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आले . तर या मुंडण आंदोलनत ..
#### नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र लवकरात लवकर नागरिकांच्या सेवेत उपलब्ध करून द्यावे…. तात्काळ रिक्त पदाची भरती प्रक्रिया सुरू करून पद भरती करावी ….. रुग्णाच्या सेवेकरिता सुसज्ज रुग्ण वाहिका उपलब्ध करून द्यावित …. तसेच सवरक्षण भिंती साठी व अन्य कामासाठी अतिरिक्त निधी त्वरित उपलब्ध करून देण्यात यावा …… तसेच सिटी स्कन व एक्सरे मशीन उपलब्ध करावी ….जेणे करून शेगाव तसेच परिसरातील सर्व गोर गरीब जनतेची गैरसोय होणार नाही .. व सर्वांना समान आरोग्याचा लाभ मोफत होईल या मुख्य हेतूने या सर्व मागण्या पूर्ण करण्या करिता प्रहार शेगाव च्या वतीने मुंडण आंदोलन करण्यात आले यात अनेक प्रहार युवकांनी मुंडण करून आरोग्य विभागाचा निषेध दर्शवला … प्रहार सेवक श्री अक्षय बोंदगुलवार , शेरखान पठाण , किशोर डुकरे , अमोल दातरकार , राकेश भूतकर , धीरज झाडे , किशोर फुलकर , आकाश नाकाडे , संदीप चौधरी , महिला आघाडी प्रमुख सौ गीताताई फूलकर, सौ कालिंदा फूलकर , सौ सुनीता कापटे , कुसुमताई वानखेडे , प्रहार सेवक विनोद उमरे , वसंता मेश्राम , अशिद मेश्राम , सचिन दानव , अभय ठेंगणे , अरविंद वांढरे , मारोती मांढवकर , व इतर सर्व परिसरातील प्रहार सेवक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होते
विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी प्रहार पक्षाचे मुंडण आंदोलन …


Add Comment