चंद्रपूर जिल्हा घडामोडी महाराष्ट्र

पदवीधर निवडणुकीत चुरस… नागपूर विभागात चार वाजेपर्यंत 53.64 टक्के मतदान..…

नागपूर :- नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज सकाळी 8 वाजता विभागातील 322 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरु झाली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त कार्यालयाकडून प्राप्त माहिती नुसार दूपारी 4 वाजेपर्यंत 53.64 टक्के मतदान झाल्याची माहिती देण्यात आली.

दुपारी 4 वाजेपर्यंत झालेल्या मतदानामध्ये जिल्हानिहाय झालेले मतदान नागपूर 53.91, भंडारा-57.77, चंद्रपूर-54.16, गोंदिया-50.80, गडचिरोली-40.54, वर्धा-57.59 टक्के असे एकूण 53.64 टक्के मतदान झाले आहे.
सकाळी 8 ला आज विभागात मतदानाला सुरुवात झाली. नव मतदारांमध्ये मतदानाची उत्सुकता दिसून आली. कोविड सुरक्षा नियमांचे पालन करून ही निवडणूक होत आहे. आज सकाळी झालेल्या मतदानात विभागीय आयुक्त डॉ.संजीव कुमार,जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी मतदान केले.

मतदानाची वेळ सकाळी 8 ते 5 वाजेपर्यंत असून विभागात 2 लाख 6 हजार 454 मतदार आहेत.

About the author

लोकवाचक न्यूज

श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959

Add Comment

Click here to post a comment

June 2022
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
error: Sorry !! Content is Copyright protected !!