Breaking News क्राइम महाराष्ट्र

शेणगाव येथे शेजाऱ्याकडूनच दोन वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार. मानूसकीला काळिमा फासणारी घटना,आरोप अटकेत

जिवती-
तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत शेणगाव येथे काल शेजारच्या 21 वर्षीय इसमाकडून जी मुलगी साधे बोलायलाही शिकली नाही अशा एका दोन वर्षीय चिमुकल्या मुलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणी जिवती पोलिसांनी 21 वर्षीय आकाश पवार नामक आरोपीला अटक केली आहे.

आरोपी हा शेजारीच राहणारा असून त्याचे कुटुंब हे पीडित मुलीच्या आजोबांचे शेत अर्धवटीने करायचे.आरोपी आकाश पवार यांनी त्या 2 वर्षीय मुलीला बाहेर फिरवण्याच्या बहाण्याने दुचाकीवर नेले.मुलीच्या घरच्यांनाही त्याच्यावर विश्वास केला त्यानंतर या नराधमाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. अत्याचार करून घरी सोडल्यावर कुटुंबियांना हा संपूर्ण प्रकार लक्षात आल्यावर सदर चिमुकलीला चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यासाठी नेण्यात आले त्यानंतर तिच्यावर लैगिक अत्याचार झाल्याचे लक्षात आले.
याप्रकरणी झालेल्या घटनेची रामनगर पोलिस ठाणे चंद्रपूर येथे तक्रार नोंदवून घेतली.चिमुरडीवर निर्दयीपणे अत्याचार करण्याऱ्या नराधमाला रामनगर पोलिसांनी जिवती पोलिसांच्या सक्रियतेने अटक केली. आकाश पवार असं याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 21 वर्षीय आरोपीचं नाव आहे.
दरम्यान माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या संपूर्ण घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. विश्वासाने घराशेजारच्या व्यक्तीकडे सोपवलेल्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या या घटनेमुळे पीडितेचं कुटुंब हादरून गेलं आहे. याप्रकरणी आरोपी आकाश पवार यांच्या विरुद्ध भां.द.वी.कलम 376 व सहकलम 4,6 बालकांचे लैगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे गुन्ह्यासबंधाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस विभागीय अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली गडचांदूर येथील पोलीस उपनिरीक्षक शुभांगी ढगे करीत आहेत.आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी आता परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

About the author

लोकवाचक न्यूज

श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959

Add Comment

Click here to post a comment

June 2022
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
error: Sorry !! Content is Copyright protected !!