मुंबईतील महत्त्वाच्या वांद्रे-वर्सोवा सी लिंक आणि वर्सोवा-विरार सी लिंक या दोन प्रकल्पांचा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आढावा घेतला. मुंबईतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी व सुखकर प्रवासासाठी हे प्रकल्प महत्त्वाचे असून त्यांच्या कामांना गती देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या वतीने आज वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत या दोन प्रकल्पांचे सादरीकरण मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या समोर करण्यात आले. वांद्रे-वर्सोवा हा सी लिंक हा ९.६ किमी असून या मार्गामुळे वाहतूक कोंडी सुटून इंधनाची बचत होणार आहे.
तसेच प्रवासाचा वेळ वाचणार आहे. हा सागरी महामार्ग सन २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. जुहू कोळीवाडा बाह्य मार्ग आणि वर्सोवा येथून पुढे हा मार्ग पश्चिम द्रुतगती मार्गाला जोडण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी यावेळी केली.
Add Comment