क्राइम महाराष्ट्र

भद्रावती शहरात एकाच रात्री दोन ठिकाणी घरफोड्या अज्ञात चोरट्यांनी सहा लाखाचा ऐवज लांबविला

पुंडलिक येवले
भद्रावती तालुका प्रतिनिधी

भद्रावती शहरातील गौतमनगर येथील एकाच रात्रौला दोन ठिकाणी घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी सहा लक्ष रुपयांचा ऐवज लांबविला सदर घटना दि.२ मार्च ला रात्रौ ला घडली.
गौतम नगर येथील अनिल गोडे हे आपल्या कुटूंबासह घरात झोपलेले असतांना अज्ञात चोरट्यांनी घराच्या समोरच्या दाराची कडी तोडून आत प्रवेश मिळविला व कपाटाच्या घरातच मिळालेल्या च्याबीच्या सहाय्याने कपाटातून एक तीन ग्रॅमची अंगठी, पाच ग्रॅमचे टॉप्स, पाच ग्रॅमचा गोफ, तीन ग्रॅमची नथ, दोन ग्रॅमची रिंग, व एक ग्रॅमचे मणी असा सोन्याचा ऐवज व एक ज्युपीटर स्कुटर असा ऐवज पळविला असतांना त्यांनी घरातील एटीएम कार्ड सोबत नेऊन त्याच्या सहाय्याने एटीएममधून पाच हजार पाचशे रुपये पळविला. हा सर्व माल ४ लक्ष ५० हजाराचा आहे. याच वार्डातील किरयाने राहणाऱ्या व मित्राच्या घरी गेलेल्या सुनील रतन निकुरे याच्या घरात प्रवेश करून पाच ग्रॅमच्या दोन अंगठ्या, दोन तोड्याचा गोफ, तीन तीन ग्रॅमच्या जीवत्या असा सोन्याचा ऐवज व नगदी पाच हजार रुपये लांबविला. याची किंमत एक लक्ष पन्नास हजार रुपये होती.उभयतांनी भद्रावती पोलिसात या प्रकाराची तक्रार दिल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी पंचनामा केला. श्वानपथकाच्या व फिंगर प्रिंट पथकाच्या मदतीने अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा भाग लागला नाही.या अज्ञात चोरट्यांचा तपास भद्रावती पोलीस करीत आहे.

About the author

लोकवाचक न्यूज

श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959

Add Comment

Click here to post a comment

June 2022
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
error: Sorry !! Content is Copyright protected !!