कोरोना ब्रेकिंग

* 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण तात्पुरते स्थगित * 45 वर्षावरील नागरिकांना मिळेल लस.

चंद्रपूर दि.13 मे : राज्य शासनाने दिलेल्या सूचनेनुसार दि. 14 मे 2021 पासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांकरिता सुरू असलेले कोविड-19 लसीकरण पुढील आदेशापर्यंत तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे तर 45 वर्षावरील नागरिक, हेल्थ केअर वर्कर व फ्रन्टलाईन वर्कर याचे लसीकरण नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे.

जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविशिल्ड लसीचे एकूण 7 केंद्र व कोव्हॅक्सिन लसीचे एकूण 11 केंद्र 18 ते 44 या वयोगटाकरिता राखीव असून उद्यापासून आरोग्य विभागाच्या पुढील आदेशापर्यंत लसीकरण स्थगित करण्यात येत आहे. मात्र 45 वर्षावरील नागरिकांकरिता कोविड-19 लसीकरण केंद्रात लसीच्या उपलब्धतेप्रमाणे लसीकरण केंद्र सुरू राहतील. याची सर्वांनी नोंद घ्यावी.असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

About the author

लोकवाचक न्यूज

श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959

Add Comment

Click here to post a comment

July 2022
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
error: Sorry !! Content is Copyright protected !!