चंद्रपूर जिल्हा घडामोडी

सर्पमित्रांनी दिले विविध मागण्याचे निवेदन….

सर्पमित्रांनी दिले विविध मागण्याचे निवेदन....

पुंडलिक येवले
तालुका प्रतिनिधी भद्रावती

भद्रावती :- महाराष्ट्र राज्यात जवळपास ५ ते १० हजार सर्पमित्र वन्यजीवाच्या रक्षणासाठी काम करित आहेत मात्र वन्यजीव संरक्षण कायद्या १९७२ नुसार कोणत्याही वन्यजीव पकड़ने,बंदिस्त करने गुन्हा आहे परंतु मानवी वस्तीत येणाऱ्या सापाचे लोकांपासून संरक्षण व्हावे आणि लोकांचे सापापासून संरक्षण व्हावे यासाठी वनविभागाकडे कोणत्याही प्रकारची उपाययोजना नाहीत सापाच्या रक्षणासाठी सर्पमित्रांना कायद्याचा बाहेर जावून काम कराव लागते वनविभागाचे नियोजन बद्ध काम नसल्याने सापाची योग्य आकडेवारीची माहिती उपलब्ध नाही साप बंदिसत करून ठेवणे, दुर्मिळ सांपाची देवाणघेवाण करणे, सापांचे – खेळ करणे, तस्करी करणे यासारख्या घटना वाढत आहेत तसेच अप्रशिक्षित सर्पमित्र यामुळे अपघात घडत आहेत. त्यामुळे सर्पमित्रांची रीतसर वनविभागात नोंद असावी, सर्पमित्रांना ओळखपत्र देण्यात यावे, युनिफार्म,सेप्टीकिट देण्यात यावे सर्पमित्रासाठी प्रशिक्षण शिबीर आयोजन करण्यात यावे सर्पमित्रांना मानधनाची तरतूद करण्यात यावी सर्पमित्राचा अपघात विमा काढण्यात यावे अशाप्रकारच्या उपाययोजना शासनस्तरावर करण्यात याव्या . याकरिता वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षण संस्था – आरमोरी यांच्या वतीने वनपरिक्षेत्राधिकारी यांच्या मार्फतीने मुख्यमत्री साहेब यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सर्पमित्र – अनुप येरणे ,श्रीपाद बाकरे , प्रणय पतरंगे ,शुभम मुरकुटे ,गोलू चौखे ,अमर किनाके शिथिल म्हहेशकर व इतर सर्पमित्र उपस्थित होते

About the author

लोकवाचक न्यूज

श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959

Add Comment

Click here to post a comment

June 2022
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
error: Sorry !! Content is Copyright protected !!