महाराष्ट्र सामाजीक

वाघिणी ने घेतला महिला वनरक्षकाचा जीव….

चंद्रपुर :- ताडोबा व्याघ्र ताडोबा अभयारण्य मध्ये सुरू झालेल्या वन्य प्राणी गणनेसाठी कर्तव्यावर असलेल्या एका महिला वनरक्षकावर माया नावाच्या वाघीनीने प्राणघातक हल्ला करून ठार केल्याची घटना आज शनिवारी (20 नोव्हेंबर 2021) ला सकाळी आठ वाजता सुमारास कोलारा गेट जवळ घडली आहे. सौ. स्वाती नानाजी ढोमणे ( 31 ) असे महिला वनरक्षकाचे नाव आहे. या घटनेने ताडोबा व्याघ्र अभयारण्यात एकच खळबळ उडाली आहे.

व्याघ्र पर्यटनासाठी जगप्रसिद्ध असलेल्या ताडोबा व्याघ्र अभयारण्य मध्ये 19 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 2021 या कालावधीत वन्यप्राणी गणना होत आहे. प्राण्यांची गणना करण्याकरिता ट्रांजिस्ट लाईन टाकण्याचे काम ताडोबा अभयारण्यातील पाणवठ्यावर सुरू आहे. कोलारा गेट जवळील कोअर झोनमध्ये पाणवठा 97 जवळ ट्रांजिस्ट लाईन टाकण्याचे काम सुरू होते, त्यामुळे आज शनिवारी (21 नोव्हेंबर 2021) ला सकाळी आठ वाजताच्या वनरक्षक स्वाती नानाजी ढोमणे ( 31 ) ह्या चौकीदारासह कर्तव्यावर गेल्या. कोलारा गेट जवळ कोअर झोनमध्ये पाणवठा 97 कडे जात असताना अचानक समोर माया नावाची वाघीण पुढे आली. तिचा रस्ता चुकवून बाजूने जाण्याचा प्रयत्न करताच माया नावाच्या वाघिणीने महिला वनरक्षकावर हल्ला चढविला. अचानक झालेल्या या हल्ल्यात वन मजूरही घाबरले मात्र त्यांनी ढुमने यांची वाघिणीने तावडीतून सुटका व्हावी यासाठी वाघिणीने हुसकवण्याचा प्रयत्न केला. मात्र वाघाने स्वातीला दाट जंगलात ओढत नेत तिला ठार केले. त्यानंतर ती वाघिण पळुन गेली. नेहमी पर्यटकांना भूरळ घालणा-या ह्या वाघिणीने आज अचानक रौद्र रूप धारण करून वनरक्षकालाच ठार केल्यानेची माहिती ताडोबात पसरताच एकच खळबळ उडाली.

सदर घटनेची माहिती ताडोबा व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना होताच त्यांनी घटनास्थळी येऊन पहाणी. मृतदेह ताब्यात पंचनामा करण्यात येत आहे. मृतक वनरक्षकाच्या पश्चात पती, एक मुलगी आहे. ती जिवती तालुक्यातील रहिवासी असल्याचे समजते. या घटनेने ताडोबातील वन कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

About the author

लोकवाचक न्यूज

श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959

Add Comment

Click here to post a comment

error: Sorry !! Content is Copyright protected !!