महाराष्ट्र सामाजीक

वीज जोडणी खंडित होऊ देणार नाही ,वीज ग्राहकाच्या सदैव पाठीशी राहणार ..माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 

चिमूर येथील विविध विकास कामाचे भूमिपूजन सोहळा

सिनेअभिनेत्री प्रार्थना बेहरे यांनी युवकाना रिजविले

चिमूर तालुका प्रतिनिधी सुरज नरुले

२८८ आमदार असून त्यातील प्रत्येक आमदारांना विधान मंडळात विकास कामे खेचून आणण्यासाठी प्रश्न करतात ही प्रकिया करीत असताना आपला आमदार प्रभावी आहे . राज्यातील १० आमदारापैकी आपला आमदार आहे.चिमूर मतदार संघाचा विकास होईलच
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने विदर्भावर अन्याय केला आहे विदर्भाच्या ११ जिल्ह्यसाठी विदर्भ वैधानिक विकास मंडळ आहे परंतु या मंडळाकडे दुर्लक्षित करून बंद करण्याचा पाप सरकारने केला आहे शेतकऱ्यांना सुद्धा एकरी २५ हजार रुपये शेतकऱ्याच्या बांधावर देण्याची घोषणा केली होती परंतु नुकसान भरपाई दिली नाही ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी मध्यम वर्गाला घरगुती वीज बिल १०० युनिट बिल माफ करण्याची घोषणा केली होती परंतु वीज बिल माफ केले नाही.राज्याच्या २२ हजार वीज ग्राहकांना वीज तोडण्याच्या नोटिसा दिल्या. आम्ही सांगितलं की १२०० युनिट कमी करून बीज बिल द्या तेव्हा राज्य सरकार हात वर करून पलटले. साडे सात लाख वीज जोडणी दिली आमच्या सरकारने कोणाचेही वीज खंडित केले नाही. राज्यात मोगलशाही सुरू आहे. वीज खंडित होऊ देणार नाही यासाठी मोठं आंदोलन करायचा आहे. राज्यातील सरकार प्रचंड वाईट स्थिती निर्माण करीत आहे. मुलीची आत्महत्या होत आहे पण सरकार लक्ष देत नाही भांगडीया परिवार समाजासाठी समर्पित आहे.मतभेद बाजूला सारून चिमूर च्या विकासाठी सोबत राहण्याचे आवाहन माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

नेता आणि अभिनेता समाज बदलवून टाकण्याची क्षमता असते . मी जशी हसत राहते तसेच आपण सुद्धा हसत रहा …सिनेअभिनेत्री प्रार्थना बेहरे

* चिमूर क्रांती जिल्हा होणारच ….आमदार बंटीभाऊ भांगडीया

विकास कामे करीत असताना पालकमंत्री यांनी अनेक विघन आणले परंतु ही क्रांती भूमीत कोणतेही विघन मिटवून देईल प्रशासन अधिकाऱ्यांनी घाबरू नये . पाणी पुरवठा योजना ही अत्याधुनिक योजना आहे वरच्या मजल्यावर सुद्धा बिगर टिल्लू पंप ने नेऊ शकतो. चिमूर जिल्हयाचा विषय पालकमंत्री यांनी मार्गी लावू शकले नाही ताडोबा पर्यटन मुळे अनेकांना रोजगार मिळाला आहे. आमच्या कडे संपत्ती असली तरी जीवनात जनतेचा विश्वास टिकविला आहे ते टिकवायची हीच संपत्ती आहे.जनतेनी जी जबाबदारी दिली ती पूर्ण करायची आहे . सन२०१९ च्या निवडणुकीत सर्वांनी एकत्रित येऊन ताकत पाडण्यासाठी लावली होती परंतु जनतेनी मला भरघोस मतांनी निवडुन दिले. कोरोना काळात कोरोनटाईन मध्ये विरोधकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला परंतु त्या काळातही मी सोशल मिडीयावरून उत्तर देत होतो.
भांगडीया दिलेला शब्द पूर्ण करतो . अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय पालकमंत्री इतर वळविण्याचा प्रयत्न करीत आहे परंतु चिमूर ची जनता पळवून लावेल पाणी पुरवठा योजना मध्ये महाविकास आघाडी सरकारने अडचणी निर्माण केल्या.वर्क ऑर्डर ने स्थगिती दिल्या असल्या तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विनंती करून स्थगिती हटविण्याचे काम केले अप्पर जिल्हाधिकारी व पाणी पुरवठा योजना स्थगिती हटविण्यासाठी कांग्रेस चे नेते पुढे का येत नाही असा सवाल सुद्धा आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी करीत चिमूर क्रांती जिल्हा निर्माण करण्याचा विश्वास दिला.

चिमूर नगर परिषद क्षेत्रातील विविध विकास कामाचे भूमिपूजन प्रसंगी माजी आमदार मितेश भांगडीया, आमदार बंटीभाऊ भांगडीया ,सत्कार मूर्ती माजी ऊर्जा मंत्री तथा भाजप प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे , खासदार अशोक नेते , विशेष अतिथी सिने अभिनेत्री प्रार्थना बेहरे, प्रमुख अतिथी वसंत वारजूकर, सौ सुमनताई पिंपळापुरे बंडूभाऊ नाकाडे महिला आघाडी तालुका अध्यक्ष माया ननावरे , प्रदेश सदस्य डॉ श्याम हटवादे, हभप गवते महाराज , भाजप जिल्हा उपाध्यक्ष निलम राचलवार, जिल्हा सचिव राजु देवतळे, शहर अध्यक्ष सचिन फरकाडे, माजी नगराध्यक्ष शिल्पा राचलवार , जीप उपाध्यक्ष रेखा कारेकर अनुसूचित जमाती आघाडी तालुका अध्यक्ष विलास कोराम, जेष्ठ नेते डॉ दीपक यावले, अड चंद्रकांत भोपे, श्रीहरी बालाजी देवस्थान अध्यक्ष डॉ मंगेश भलमे, व्यापारी संघटना अध्यक्ष प्रवीण सातपुते आदी उपस्थित होते .

अध्यक्षस्थाना वरून बोलताना माजी आमदार मितेशजी भांगडीया म्हणाले की किर्तीकुमार यांचा एकच ध्येय विकास कामे करून ८० टक्के समाजकारण करून राजकारण करीत असल्याने कोणीही नाकारू शकत नाही. राज्यात नवीन झालेल्या नगर परिषद मध्ये 24/ 7 ही पाणी पुरवठा योजना पहिली आहे . कठीण स्थितीतून ही योजना आणली आहे . नप मध्ये कांग्रेस च्या सत्तेने नगरसेवकांना चुकीची दिशाभूल केली होती. ही योजना नप करू शकत नाही.फक्त एनजीपीच करू शकते कारण त्यांचे कडे सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहे. चिमूरकरानी मात्र या पाणी योजनेचा विरोध केला तर विरोध करा कारण तुम्हाला पाणी पाहिजे . विरोध करणाऱ्यांचा कोण बोलविता धनी आहे ? याचा सवाल करावा. अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू झाला असताना जिल्ह्यातील एका मंत्र्यांमुळे थोडं थांबला आहे. यानंतर पुढची जिल्ह्याची होती तेव्हा जनतेने सवाल करावा

दरम्यान श्री मानिका देवी देवस्थान वडाळा पैकू पोच मार्गाचे खडीकरण व डांबरीकरण करणे निधी १४.९९ लक्ष रुपये, श्री भवानी माता मंदिर सौंदरीकरण व सभागृह बांधकाम करणे २४.९८ लक्ष रुपये ,
सरकारी राईस मिल ते आर टी कॉलेज चौपदरीकरण सिमेंट काँक्रेट रस्ता १३.५० कोटी रुपये,
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान कार्यक्रम अंतर्गत चिमूर वाढीव पाणी पुरवठा योजना ५८.११ कोटी रुपये व श्रीहरी बालाजी देवस्थान येथे भक्तनिवास व अन्य विकास कामे १० कोटी रुपये या कामा चे भूमिपूजन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले .
चिमूर येथील धीरज लोथे या युवकाने सिने अभिनेत्री प्रार्थना बेहरे चे रेखाचित्र काढलेले फोटो प्रदान केले.
प्रास्ताविक भाजप तालुका अध्यक्ष राजू पाटील झाडे, संचालन विवेक कापसे तर जयंत गौरकर आभार यांनी व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समीर राचलवार, विकी कोरेकर , बंटी वनकर, मंगेश भुसारी, निखिल भुते, सचिन डाहुले , संजय खाटीक श्रेयस लाखे, अमित जुमडे,कैलास धानोरे सतीश जाधव सागर भागवतकर , सौरभ बडगे, शुभम भोपे ,गुणवंत चटपकार ,राहुल खोबरे आदी अथक परिश्रम घेतले.या भूमिपूजन सोहळ्यास दोन हजार नागरिक उपस्थित होते.

About the author

लोकवाचक न्यूज

श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959

Add Comment

Click here to post a comment

June 2022
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
error: Sorry !! Content is Copyright protected !!