Breaking News पोलीस रिपोर्टर

भद्रावती येथे गळफास घेऊन युवकाची आत्महत्या…

भद्रावती,दि.१३(तालुका प्रतिनिधी)
भद्रावती शहरातील जवळे प्लाॅट येथे राहणाऱ्या एका युवकाने घरातच दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि. १३ ला पहाटे ४ वाजता उघडकीस आली.
मयूर विजय भुसे (२०) असे मृतक युवकाचे नाव असून तो वरोरा येथील माता महाकाली पॉलिटेक्निकचा विद्यार्थी होता. शैक्षणिक तणावातून त्याने आत्महत्या केली असावी असे त्याच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले. त्याने महाविद्यालयात परीक्षा शुल्क दोन हजार रुपये भरले होते.मात्र त्याचे पैसे परत आले होते. त्यामुळे आपले शैक्षणिक वर्ष वाया जाईल की काय याची चिंता त्याला नेहमी सतावत होती. असेही घरच्याकडून कळले. मात्र आत्महत्येचे अधिकृत कारण कळू शकले नाही.आईवडील यापूर्वीच वारले असल्याने याचा व त्याच्या लहान भावाचा सांभाळ त्याची आजी व काका काकू करीत होते.
घटनेच्या दिवशी पहाटे ४ वाजता त्याची आजी पाणि भरण्यासाठी उठली असता घटना स्वयंपाकघरात स्लॅबला असलेल्या एका हुकात दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत मयूर आढळून आला. तेव्हा ही घटना उघडकीस आले. या घटनेची तक्रार भद्रावती पोलिसात केल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला व शव शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथे पाठविले.सदर घटनेचा अधिक तपास भद्रावती पोलीस करीत आहे.

About the author

लोकवाचक न्यूज

श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959

Add Comment

Click here to post a comment

June 2022
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
error: Sorry !! Content is Copyright protected !!